बॉलीवूड अभिनेत्री आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान बॉलीवूडमधील पदार्पणानंतर खूपच लोकप्रिय झाली. साराने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत बॉलीवूडमध्ये डेब्यू करत बॅक टू बॅक २ हिट चित्रपट दिले होते. साराने बॉलीवूड बॉलीवूडमधील आपल्या अभिनय करियरची सुरुवात केदारनाथ चित्रपटामधून केली होती. यानंतर सारा रणवीर सिंहसोबत सिंबा चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती जो ब्लॉकबस्टर हिट चित्रपट होता. सारा सध्या आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.

साराच्या अभिनय कौशल्याचे आणि प्रोफेशनल व्यवहाराचे कौतुक तिचे को-स्टार सुशांत सिंह राजपूत आणि रणवीर सिंह यांनी देखील केले आहे. पण साराच्या एका सवयीमुळे तिला सुशांत आणि रणवीरची माफी मागावी लागली होती. सारा सध्या आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.

नुकतेच एका मुलाखतीदरम्यान साराने खुलासा केला आहे कि तिच्या एक वाईट सवईमुळे सुशांत सिंह राजपूत आणि रणवीर सिंहची तिला माफी मागावी लागली होती. मिडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये साराने सांगितले कि मला नैसर्गिक गोष्टी आवडतात. मी चेहऱ्यावर कॉस्मेटिक लावण्यापेक्षा घरगुती उपाय करणे जास्त पसंत करते. पण यामुळे सुशांत आणि रणवीर दोघांनाहि त्रास झाला होता.

साराने सांगितले – मी माझ्या केसांना चमकदार बनवण्यासाठी कांद्याचा रस लावत असते. यामुळे केस खूपच सुंदर दिसतात. पण यामुळे माझे को-स्टार सुशांत सिंह राजपूत आणि रणवीर सिंह यांना खूपच त्रास झाला होता. साराने हे देखील सांगितले कि जेव्हा कधी मी असे करत होते तेव्हा मी त्यांना सांगत होते.

रणवीरने विचारले कि असे का करते, तेव्हा तिने सांगितले कि मी माझ्या केसांना चमकदार बनवण्यासाठी असे करत असते. साराने म्हंटले कि – असे केल्यामुळे माझ्यामुळे सुशांत सिंह राजपूत आणि रणवीर सिंह या दोघांना त्रास सहन करावा लागला त्यामुळे मी दोघांचीहि माफी मागितली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने