कोरोना महामारीमुळे देशामध्ये लागलेल्या लॉकडाउनपासून दिलासा देत अनलॉक १ नंतर देशभरामध्ये अनलॉक २ लागू करण्यात आला आहे. हा अनलॉक जवळ जवळ अनलॉक १ सारखाच आहे. जी शिथिलता जनतेला अनलॉक १ मध्ये मिळाली होती त्याला अनलॉक २ मध्ये कायम ठेवण्यात आले आहे. यादरम्यान हँगआऊट करताना अभिनेत्रीचे अनेक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून काही सूचनांसह लोक घराबाहेर पडत आहेत.

अशामध्ये ३ महिन्यांपासून घरामध्ये कैद असलेले स्टार्स मुंबईच्या रस्त्यावर स्पॉट केले जाऊ लागले आहेत. नुकतेच दिशा पटानीला बांद्रा येथील एका स्टोरच्या बाहेर स्पॉट केले गेले आहे. या दरम्यान दिशा ऑरेंज टँक टॉपसह ब्लू ट्राऊजरमध्ये पाहायला मिळाली. दिशाचा हा कुल स्पोर्ट्स लूक सर्वाना पसंत येऊ लागला आहे. दिशाचे हे फोटो सोशल मिडियावर चांगले व्हायरल देखील होऊ लागले आहेत.

लुक कंपलीट करताना दिशाने आपले हेयर्स ओपन ठेवले आहेत, जे तिच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर घालत आहेत. नुकतेच अभिनेत्री दिशा पटानीला मुंबई येथील बांद्रा येथे पाहिले गेले होते. दिशा पटानीचा कुल लुक सर्वांनाच खूप वेड लावत आहे. अभिनेत्रीचे सर्व फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती टायगर श्रॉफसोबत बागी ३ चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती तर त्याचबरोबर तिने मलंग चित्रपटामध्ये आदित्य रॉय कपूरसोबत काम केले होते. दिशाचे हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकले. तर दिशा केटिना आणि मलंग २ या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहे. हे दोन्ही चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने