श्रीदेवी बॉलीवूडची नामांकित अभिनेत्री राहिली होती. श्रीदेवीने आपल्या करियरमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आणि अनेक मोठमोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले. गेल्या वर्षी २४ फेब्रुवारीला श्रीदेवीचे निधन झाले होते. श्रीदेवीचा मृत्यू दुबईच्या एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडल्यामुळे झाला होता.

२४ फेब्रुवारीला श्रीदेवीची पहिली पुण्यतिथी होती. श्रीदेवीच्या डेथ एनिवर्सरी निमित्त बोनी कपूरने एक मोठा निर्णय घेतला आहे. बोनी कपूरने श्रीदेवीच्या साडीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे आणि यामधून जे पैसे मिळणार आहेत ते गरजू लोकांना दान करणार आहेत.

मिडिया रिपोर्टनुसार श्रीदेवीच्या कोटा साडीचा बोनी कपूर लिलाव करणार आहेत. हि साडी पारिसेरा नावाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, जिथे बोली लावून हि साडी खरेदी केली जाऊ शकते.

श्रीदेवीच्या साडीच्या लिलावाची सुरुवात ४०००० रुपये पासून केली गेली आहे. श्रीदेवीची साडी खरेदी करण्यासाठी लोक खूपच उत्सुकता दाखवत आहेत आणि या साडीवर आतापर्यंत सर्वात जास्त १२५००० रुपये इतकी बोली लागली आहे.

वेबसाईटवर श्रीदेवीच्या साडीबद्दल माहिती देण्यात आली आहे. वेबसाईटवर श्रीदेवीच्या साडीबद्दल लिहिले आहे कि श्रीदेवीची सिक्स यार्ड साडी तिच्या साउथ इंडियन रुटची आठवण करून देते. श्रीदेवीचा जन्म साउथ इंडियामध्ये झाला होता आणि ती साडी तिची ओळख बनली होती.

बातमीनुसार श्रीदेवीच्या साडीच्या लीलावातून जो काही पैसा मिळणार आहे, तो कंसर्न इंडिया फाउंडेशन प्रोग्रामला देण्यात येणार आहे. हे फाउंडेशन स्त्रिया, मुले आणि दिव्यांग वृद्धांसाठी काम करते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने