बॉलीवूडमध्ये आपल्या सुपरचार्ज एनर्जी, उत्कृष्ठ अभिनय आणि आकर्षक लुकसाठी फेमस रणवीर सिंहचा आज वाढदिवस आहे. रणवीर सध्या करोडो लोकांच्या मनावर राज्य करत आहे. रणवीर सिंह आज ३५ वर्षांचा झाला आहे. त्याच्या बँड बाजा बारात या पहिल्या चित्रपटापासून ते ८३ या त्याच्या आगामी चित्रपटापर्यंत त्याने बॉलीवूडमध्ये आपले वर्चस्व गाजवले. पण बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये रणवीर फक्त आपल्या अभिनयामुळेच नाही तर तर जबरदस्त एनर्जीसाठी देखील ओळखला जातो.

कॉलेजमध्ये धर्मेंद्रच्या मुलीवर झाले होते प्रेम

रणवीरची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या अगोदर रणवीरच्या अनेक अभिनेत्रींच्या अफेयरच्या चर्चा बऱ्याच गाजल्या होत्या. यामध्ये सर्वात पहिले नाव हेमा मालिनी आणि धर्मेंद्रची मुलगी आहना देओलचे नाव राहिले. कॉलेजच्या काळामध्ये या दोघांचे अफेयर खूपच चर्चेमध्ये राहिले होते. कॉलेजच्या दिवसांमध्ये काही काळासाठी या दोघांनी एकमेकांना डेट केले होते. तथापि या रिलेशनबद्दल दोघांनी कधीच उघडपणे वक्तव्य केले नाही.

अनुष्का शर्माला केले बराच काळ डेट

आपल्या डेब्यू चित्रपट बँड बाजा बारातची अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत रणवीरचे नाव देखील जोडले गेले होते. या दोघांनी बरेच दिवस एकमेकांना डेट केले होते. बँड बाजा बारात शिवाय लेडीज वर्सेस रिकी बहल आणि दिल धडकने दोमध्ये देखील या दोघांची जोडी एकत्र पाहायला मिळाली. पण काही कारणामुळे या दोघांचे रिलेशन फार काळ टिकले नाही आणि दोघांनी आपले वेगवेगळे मार्ग निवडले.

सोनाक्षी सिन्हा आणि परिणीती चोप्रासोबत देखील जोडले गेले नाव

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत देखील रणवीरचे नाव जोडले गेले होते. लुटेरे चित्रपटाच्या शुटींग दरम्यान या दोघांच्या अफेयरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. तर प्रियांका चोप्राची बहिण परिणीती चोप्रासोबत रणवीरच्या लव्ह अफेयरच्या बातम्या देखील मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. पद्मावत चित्रपटामध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेमुळे रणवीर चांगला चर्चेत राहिला. आपल्या लुकमुळे देखील तो नेहमीच चर्चेमध्ये राहत असतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने