जिंदगी झंड है, फिर भी घमंड है, हा डायलॉग रवि किशनची ओळख आहे. भोजपुरी चित्रपटांचे सुपरस्टांर रवि किशनने अनेक भाषांच्या चित्रपटांमध्ये आपल्या शानदार अभिनयाच्या जोरावर दर्शकांची मने जिंकली आहेत. नेता पासून अभिनेता बनलेले रवि किशन हे आता ५१ वर्षांचे झाले आहेत. रवि किशनला भोजपुरी चित्रपटाचे शहंशाह म्हंटले जाते. पण त्यांनी फक्त भोजपुरीच नाही तर बॉलीवूड पासून ते साउथ फिल्म इंडस्ट्रीपर्यंतच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चला तर रवि किशन बद्दल जाहून घेऊया काही खास गोष्टी.

रामलीला मध्ये सिता मातेची भूमिका साकारली

रवि किशनच्या अभिनय करियरची सुरुवात रामलीला पासून झाली, माता सिताची भूमिका साकारायला त्यांना खूप मजा वाटायची. रविने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते कि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची पत्नी, आई आणि मुलगी खूपच खास आहेत. ते आपली पत्नी प्रितीचे चरण स्पर्श देखील करतात. वडील मुंबई येथील सातांक्रूज भागामध्ये दुधाचा व्यापार करत होते. वडिलांची इच्छा होती कि रविने देखील हे काम करावे, पण त्यांची डेयरी बंद झाली. संपूर्ण कुटुंब जौनपुरला परत आले. तिथे गेल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच खराब झाली, ते एका मातीच्या घरामध्ये राहू लागले.

वडील आणि आईचा करतात खूप सन्मान

एका मुलाखतीमध्ये भोजपुरी स्टार रविने सांगितल होते कि त्यांच्याजवळ आपल्या आईला साडी देखील खरेदी करण्यापुरते पैसे नव्हते. एकदा त्यांनी ३ महिन्यांपर्यंत वर्तमानपत्र विकण्याचे काम केले होते, आणि पैसे जमा करून आईसाठी ७५ रुपयेची साडी खरेदी केली होती. पण जेव्हा त्यांनी आईला साडी दिली तेव्हा त्यांना खूप राग आला आणि त्यांनी रविला थप्पड मारली. पण जेव्हा त्यांनी सर्व खर सांगितले तेव्हा त्यांची आई त्यांना मिठी मारून खूप रडली.

रवि किशन यांच्या वडिलांची इच्छा नव्हती कि मुलाने अभिनेता बनावे, त्याच्या डोक्यावरून अभिनयाचे बहुत उतरवण्यासाठी वडिलांनी त्यांना बेल्टने मारले होते. पण रविसाठी तो मार देखील एक शिकवण म्हणून आठवणीत आहे, रविने म्हंटले कि जर त्यांच्या वडिलांनी असे केले नसते तर तो एक गुंड किंवा पुरुष से क्स व र्क र बनला असता.

११ वी मध्ये असताना पत्नीला भेटले

भोजपुरी स्टार रवि किशन यांची पत्नी प्रिती खूपच साधरण महिला आहे, ती लाइमलाइटपासून दूर राहणेच जास्त पसंत करते. रविने सांगितले कि ते ११ वी मध्ये असतानाच प्रितीला पसंत करू लागले होते आणि तिला आपली जीवनसाथी बनवू इच्छित होते. मुलाखतीमध्ये रविने सांगितले कि प्रितीने त्यांना प्रत्येक सुख-दुखामध्ये साथ दिली आहे. रवि प्रितीला नारी शक्तीचे साक्षात उदाहरण मानतात. रवि किशन तीन मुली आणि एका मुलाचे वडील आहेत.

भाग्यवान आहे, ३ मुलींचा पिता आहे

भोजपुरी स्टार रवि किशन स्वतः खूपच भाग्यवान मानतात, तीन मुली रीवा, तनिष्क आणि इशिता आणि मुलगा सक्षमचे वडील रवि म्हणतात कि ते आपल्या मुलींला देवीचे रूप मानतात आणि त्यांची पूजा करतात. त्यांची मोठी मुलगी रीवाने देखील सब कुशल मंगल या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला आहे. रवि किशन आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर नेहमी आपल्या कुटुंबाचे फोटो शेयर करत असतात. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासून रवि किशन यांनी राजकारणाचा सफल प्रवास देखील सुरु केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने