टीव्ही जगतातील प्रसिद्ध शो भाबीजी घर पर हैं मध्ये अनिता भाभीची भूमिका साकारणारी सौम्य टंडन प्रत्येक घरामध्ये फेमस झाली आहे. शोमध्ये हप्पू सिंह त्यांना प्रेमाने गोरी मेम म्हणून बोलावतो आणि आज हीच सौम्याची ओळख बनली आहे.

३ नोव्हेंबर १९८४ रोजी उज्जैनमध्ये जन्मलेली सौम्या खूपच सुंदर आहे आणि हेच कारण आहे कि २००६ मध्ये एका प्रसिद्ध मॅगझिनसाठी झालेल्या कव्हर गर्ल कॉन्टेस्टमध्ये ती फर्स्ट रनरअप बनली होती. सौम्या दिसायला खूपच सुंदर आहे पण एकदा तिचे हेच सौंदर्य तिचे शत्रू बनले होते.

टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी काय करत होती भाभीजी आणि तिचे सौंदर्य तिचे शत्रू का बनले होते चला जाणून घेऊया. टीव्हीची प्रसिद्ध गोरी मेम सौम्या टंडनला तिच्या गोऱ्या रंगामुळे अनेक इंटरनेशल प्रोजेक्ट्सला मुकावे लागले होते. झाले असे कि प्रोजेस्ट्ससाठी त्यांना एका भारतीय मुलीची गरज होती पण त्या फॉरेन प्रोजेक्टसवाल्यांसाठी त्यांना एक भारतीय सावळी मुलगी हवी होती.

सौम्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले कि तिला विश्वास होत नव्हता कि एखादी भारतीय मुलगी इतकी गोरी कशी असू शकते. तिचे माणणे होते कि अमेरिका आणि ब्रिटनसारख्या पश्चिमी देशातील मुली गोऱ्या असतात. त्यांनी मला साफ नकार दिला कि आम्ही सावळ्या मुलीला या प्रोजेक्टसाठी घेणार आहोत.

तुम्ही लक्ष देवून पाहिले असेल कि आजदेखील त्यांना शोमध्ये भारतीय, पाकिस्तानी किंवा बांगलादेशी मुलगी दाखवायची असते तेव्हा ते एखाद्या सावळ्या मुलीला घेऊन जातात जे एकदम चुकीचे आहे. सौम्याने हे देखील सांगितले कि आपल्या देशामध्ये आज देखील लोक गोरेपणाला सौंदर्याशी जोडून पाहतात, जे चुकीचे आहे, प्रत्येक रंग सुंदर असतो.

तुम्हाला कदाचित माहिती नसेल कि एक उत्कृष्ठ अभिनेत्री सोबतच सौम्या एक अँकर, कवी आणि कलाकार आहे. आपल्या करियरमध्ये तिने अनेक मोठमोठे शो होस्ट केले आहेत, ज्यासाठी तिला बेस्ट अँकरचा अॅवॉर्ड देखील मिळाला आहे. सौम्याने बॉर्नविटा क्विज़ कॉन्टेस्ट पासून सुरुवात केली होती, ज्यानंतर तिने मल्लिका ए किचन, कॉमेडी सर्कस के तानसेन, ज़ोर का झटका: टोटल वाइपआउट, डांस इंडिया डांस आणि एंटरटेनमेंट की रात सारखे अनेक शोच्या सिजंसला होस्ट केले आहे. डांस इंडिया डांस साठी तिला बेस्ट अँकरचा अॅवॉर्ड मिळाला होता.

चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तिने जब वी मेट चित्रपटामधून एक सपोर्टिंग अॅक्ट्रेस म्हणून डेब्यू केला होता. चित्रपटामध्ये त्यांनी करीना कपूरची बहिण रूप ढिल्लनची भूमिका साकारली होती. याशिवाय ती २०११ मध्ये वेलकम तो पंजाब या पंजाबी चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती.

सौम्या टंडनला अभिनयासोबत शायरी आणि गझलची देखील आवड आहे. सांगण्यासारखी गोष्ट हि आहे कि सौम्यामध्ये तिच्या वडिलांचे लेखणी गुण आले आहेत. कविता लिहिणे आणि वाचणे त्यांचा छंद आहे. नुकतेच तिने सांगितले कि लॉकडाउनदरम्यान मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी तिने एक शॉर्ट फिल्मची स्क्रिप्ट लिहिली आहे.

अभिनेत्री सौम्या टंडनने २०१६ मध्ये तिचा बॉयफ्रेंड सौरभ देवेंद्र सिंह सोबत लग्न केले. गेल्या वर्षी १९ जानेवरीला सौम्याने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. लॉकडाउनमध्ये सौम्याला तिच्या मुलासोबत खूप क्वालिटी वेळ घालवायला मिळाला. सौम्याने लॉकडाउन दरम्यान अनके डांस व्हिडिओही शेअर केले आणि आपली पाककलेची झलक देखील दाखवली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने