सध्या डेटिंग एक सामान्य गोष्ट झाली आहे, पण असे असूनदेखील बहुतेक लोक अरेंज मॅरेज करणेच पसंत करतात. अरेंज मॅरेज आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. आजदेखील बहुतेक तरुण आपल्या आईवडिलांच्या पसंतीने लग्न करू इच्छितात. देशामध्ये ६० टक्के तरुण अरेंज मॅरेज करू इच्छितात. स्टॅटिस्टिक्स ब्रेन रिसर्च इंस्टीट्यूट नुसार अरेंज मॅरेजमध्ये घटस्फोटाचा दर ६ टक्के इतका आहे. हेच कारण आहे कि जगामध्ये आजदेखील अनेक लोक आईवडिलांच्या पसंतीने लग्न करण्यावर जास्त विश्वास ठेवतात. तथापि काही लोक अरेंज मॅरेजच्या विरुद्ध आहेत कारण कि त्यांचे मानणे आहे कि ज्याच्यासोबत आपले पूर्ण आयुष्य जाणार आहे त्याची निवड करण्याचा अधिकार आपल्याला असायला हवा. यादरम्यान आज आम्ही तुम्हाला अरेंज मॅरेजचे काही फायदे सांगणार आहोत.
घटस्फोटाचा रेट लव्ह मॅरेजच्या रेटपेक्षा खूपच कमी आहे
सर्वात पहिला आपण अरेंज मॅरेजच्या सक्सेस रेटबद्दल बोलूयात. विकिपीडिया आकडेवारीनुसार एक नजर टाकल्यास ६.३ टक्के हा तो आकडा आहे जो हे सांगतो कि अरेंज मॅरेज अन्य मॅरेजच्या तुलनेमध्ये कितीतरी पटीने स्थिर आहे. भारतामध्ये अरेंज मॅरेजच्या घटस्फोटाचा रेट लव्ह मॅरेजच्या रेटपेक्षा खूप कमी आहे.
एकमेकांना जाणून घेण्यासाठी स्वतः वेळ काढतात
अरेंज मॅरेजमध्ये खूपच कमी चांस असतो कि तुम्ही तुमच्या पार्टनरला खूपच आधीपासूनच ओळखत असता. यामुळे लग्नानंतर तुम्ही एकमेकांना जाणून घेण्यासाठी स्वतः वेळ काढता. अशामध्ये तुम्ही एकमेकांच्या जवळ येता. तुम्ही तुमच्या पार्टनरला तो जसा आहे तसा एक्सेप्ट करता. तुमच्या मनामध्ये हि गोष्ट येत नाही कि तो लग्नानंतर बदलला आहे.
लग्नाची जबाबदारी तुमची फॅमिली घेते
अरेंज मॅरेजमध्ये तुमच्या लग्नाची जबाबदारी तुमची फॅमिली घेते. तर तुमच्या दोघांच्या नात्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी तुमची सर्व फॅमिली तुम्हाला साथ देते. लव्ह मॅरेजमध्ये फॅमिलीतील लोक नेहमी हेच म्हणतात कि तुझी पसंत आहे तूच बघून घे.
तुम्ही त्या फॅमिलीमध्ये अडजस्ट करू शकाल कि नाही
लग्न हे दोन जीवांचे मिलन नसते तर दोन फॅमिलीचे देखील मिलन असते. अशामध्ये एकमेकांच्या रीतीरिवाजांना समजून घेणे खूपच जरुरीचे असते. जेव्हा तुमचे आईवडील तुमच्यासाठी जोडीदार शोधतात तेव्हा या गोष्टीची काळजी जरूर घेतात कि तुम्ही त्या फॅमिलीमध्ये अडजस्ट करू शकाल कि नाही. तर जेव्हा तुम्ही तुमच्या पसंतीने लग्न करता तेव्हा तुम्हाला सर्व एक्सेप्ट करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो.
लग्नानंतर फाइनेनशियल किती सिक्योर राहाल
जेव्हा आईवडील लग्नाच्या गोष्टी ठरवतात तेव्हा हे देखील पाहतात कि त्यांची मुले लग्नानंतर फाइनेनशियल किती सिक्योर राहतील. तर जेव्हा तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या विरुद्ध जाऊन आपल्या मर्जीने लग्न करता तेव्हा तुम्हाला या समस्यांशी स्वतःलाच सामना करावा लागतो आणि याचा वाईट परिणाम दोघांच्या नात्यावर देखील पडतो.
टिप्पणी पोस्ट करा