बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीने अचानक लग्न करून सर्वांनाच चकित केले होते. त्यावेळी अनुष्काचे करियर शिखरावर होते. तर विराट देखील मैदानावर धावांचा पाऊस पाडत होता. दोघांच्या लग्नाला आता बराच काळ लोटला आहे. २०१७ च्या डिसेंबरमध्ये जेव्हा अनुष्काने विराटसोबत लग्न केले होते तेव्हा ती २९ वर्षांची होती. नुकतेच अनुष्काने सांगितले कि तिने एक अभिनेत्री असून देखील इतक्या लहान वयामध्ये लग्न का केले?

एका न्यूज वेबसाईटशी बोलताना अनुष्का शर्मा म्हणाली कि, आमच्या ऑडियंसचा आमच्या इंडस्ट्रीपेक्षा जास्त विकास झाला आहे. आता दर्शक कलाकारांना फक्त पडद्यावरवर पाहणे पसंत करतात. त्यांना व्यक्तिगत जीवनाशी काही देणेघेणे नाही.

अनुष्का पुढे म्हणाली, त्यांना फरक पडत नाही कि तुमचे लग्न झाले आहे का नाही किंवा तुम्ही आई बनल्या आहात का. आपल्याला यातून बाहेर पडायला हवे. मी २९ व्या वर्षी लग्न जे एक अभिनेत्रीसाठी खूपच कमी वय आहे. मी असे यामुळे केले कारण मी प्रेमात पडले होते, आणि मी त्याच्यावर प्रेम करते. लग्न एक अशी गोष्ट आहे जे नात्यांना पुढे घेऊन जाते. मी नेहमी याच गोष्टीसाठी उभी आहे कि महिलांना सामान वागणूक मिळाली पाहिजे.

अनुष्का पुढे म्हणाली कि, त्याची इमानदारी अशी गोष्ट आहे ज्याचा मी खूप सन्मान करते. मी एक इमानदार मुलगी आहे यामुळे मी या गोष्टीबद्दल खूपच सतर्क राहते. मी खूपच खुश आहे कि मी त्याच्यासारख्या एका व्यक्तीला भेटले, कारण आम्ही दोघेही आमचे आयुष्य पूर्ण इमानदारीने जगतो. माझ्याजवळ एक असा जोडीदार आहे ज्याच्याजवळ काहीच खोटे नाही, सर्वकाही खरे आहे.

अनुष्का पुढे म्हणाली कि माझी इच्छा नव्हती कि आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण जगताना माझ्या हृदयामध्ये कोणतीही भीती असावी. जर एका व्यक्तीला लग्न केल्यानंतर आणि त्यानंतर काम करताना कोणतीही भीती वाटत नाही तर महिलांच्या बाबतीत असे का होऊ नये? विराट कोहली आणि अनुष्का शर्माने ११ डिसेंबर २०१७ रोजी इटलीमध्ये लग्न केले होते. दोन्ही कलाकारांनी अनेक रिसेप्शनचे आयोजन केले होते, ज्यामध्ये बॉलीवूड पासून ते राजकारण्यांपर्यंत अनेक दिग्गज उपस्थित राहिले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने