सुशांत सिंह राजपूतच्या आ त्म ह त्येचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला आहे. वास्तविक त्याच्या निधनाच्या जवळ जवळ दीड महिन्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पटनामध्ये रिया चक्रवर्ती विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. कुटुंबाच्या या पाऊलानंतर सुशांतचे चाहते आणि मित्रांमध्ये एक अशा निर्माण झाली आहे कि कदाचित आता सुशांतच्या निधनाचे खरे कारण समोर येईल. सुशांतची बहिण श्वेता सिंह कीर्तीने भावासाठी न्यायाची मागणी केली केल्यानंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने देखील ट्वीट केले आहे.

धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न

सुशांतची एक्स गर्लफ्रेंड तिच्या निधनानंतर खूपच अस्वस्थ होती. ती या धक्क्यामधून बाहेर येण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. सुशांत प्रकरणाच्या तपासावर नाराज सुशांतच्या वडिलांनी पटनामध्ये एफआईआर दाखल केली आहे. ज्यामुळे अंकितालाहि आशा मिळाली आहे. तिने ट्वीट केले आहे, ज्यामध्ये लिहिले आहे सत्य जिंकेल. अंकिताच्या या ट्वीटवर चाहते खूप कमेंट करत आहेत.

सुशांतच्या वडिलांचा जबाब नोंदवला

सुशांतचे वडील केके सिंह यांच्या जबाबावर राजीव नगर ठाण्यामध्ये एफआईआर दाखल केली आहे. कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे कि रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांनी सुशांतला धोखा दिला आहे. त्याचे पैसे हडप करून त्याला मानसिक रूपाने त्रास दिला. इतकेच नाही तर सुशांतला आपल्या कुटुंबापासून दूर ठेवण्याचा देखील प्रयत्न केला. आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी बिहार पोलिसांची एक टीम मुंबईला पोहोचली आहे. जी मुंबई पोलिसांसोबत पुन्हा नव्याने तपास सुरु करेल.

बहिणीने केली न्यायाची मागणी

सुशांतच्या बहिणीने देखील सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यामध्ये तिने भावासाठी न्यायाची मागणी केली आहे. सुशांतच्या वडिलांद्वारे एफआईआर दाखल केल्यानंतर तिने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यामध्ये लिहिले आहे कि जर खऱ्याने काही फरक पडत नाही तर काहीच फरक पडत नाही. हॅशटॅग जस्टिस फॉर सुशांत सिंह राजपूत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने