सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात दाखल झालेल्या ‘आ त्म ह त्येला प्रवृत्त करण्याबद्दल’च्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार पोलिसांनी देखील तपास सुरु केला आहे. सुशांतचे वडील ७४ वर्षीय कृष्ण कुमार सिंह यांनी मंगळवारी पटनामध्ये रिया आणि सहा इतर लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. अशामध्ये दिवंगत अभिनेता सुशांतची पूर्व गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडेची देखील पोलिसांनी चौकशी केली. यादरम्यान तिने हैराण करणारा खुलासा केला.

रियामुळे खूपच अस्वस्थ होता सुशांत

न्यूज वेबसाईटच्या ताज्या रिपोर्टनुसार अंकिताने पोलिसांना सांगितले कि सुशांत रियामुळे खूपच अस्वस्थ राहत होता. अंकिताने खुलासा केला कि सुशांत आणि तिची २०१९ मध्ये मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान बातचीत झाली होती. तेव्हा सुशांतने तिला उघडपणे रियासोबतच्या त्याच्या नात्याबद्दल सांगितले होते. अंकिताने पोलिसांना सांगितले कि सुशांतने तिला आपल्या पहिल्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आणि बातचीत दरम्यान तो खूपच भावूक झाला होता.

या नात्यामुळे खूपच दुखी होता सुशांत

त्याने अंकिताला सांगितले होते कि तो या नात्यामुळे खूपच दुखी आहे आणि त्याला हे नाते संपुष्टात आणायचे आहे कारण रिया त्याला त्रास देत होती. सुशांत आणि अंकितादरम्यानची बातचीत अभिनेत्रीने बिहार पोलिसांसोबत शेयर केली आहे. इतकेच नाही यादरम्यान अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूतमध्ये रिया चक्रवर्तीबद्दल अनेक संभाषणे झाली, जे अभिनेत्रीने पोलिसांसोबत शेयर केले आहेत. अंकिता आणि सुशांतने एकमेकांना जवळ जवळ सहा वर्षे डेट केले होते. दोघांचे रिलेशनशिप २०१० मध्ये सुरु झाले आणि २०१६ मध्ये संपुष्टात आले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने