बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने एक महिन्यापूर्वी या जगाचा निरोप घेतला होता. तथापि त्याच्या निधनामुळे चाहते आणि अनेक सेलेब्स अजूनदेखील धक्क्यामध्ये आहेत. सुशांतने मुंबई येथील बांद्रा स्थित आपल्या राहत्या घरामध्ये १४ जून रोही ग ळ फा सघेऊन आ त्म ह त्याकेली होती. त्याच्या मृत्यूमुळे त्याचे सर्व चाहते हैराण आहेत. यादरम्यान सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने त्याच्या आठवणीमध्ये सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर केली आहे.

घरातल्या मंदिराचा शेयर केला फोटो

अंकिताने सोशल मिडियावर आपल्या घरातील मंदिराचा एक फोटो शेयर केला आहे, ज्यामध्ये देवासमोर दिवा प्रज्वलित केला आहे. या फोटोसोबत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि आशा, प्रार्थना आणि शक्ती. तू जिथे असशील तिथे नेहमी हसत रहा. अंकिताच्या या पोस्टला पाहून चाहते पुन्हा एकदा भावूक झाले आहेत. वास्तविक सुशांतच्या मृत्यूला भलेहि एका महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे पण कोणालाही हि बातमी स्वीकार करने इतके सोपे नाही आहे.

याआधी देखील शेयर केला आहे मंदिराचा फोटो

अंकिताने हि पोस्ट सुशांतचा शेवटचा चित्रपट दिल बेचाराच्या प्रदर्शनाच्या अवघ्या दोन दिवसांअगोदर शेयर केली आहे. अशामध्ये असा अंदाज लावला जात आहे कि अंकिताने त्याच्या चित्रपटासाठी प्रार्थना केली आहे. हि पहिली वेळ नाही जेव्हा अंकिताने सोशल मिडियावर आपल्या घरातील मंदिराचा फोटो शेयर केला आहे. तिने नुकतेच मंदिराचा एक फोटो सोशल मिडियावर शेयर केला होता. यासोबत एक कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते कि, देवाचा मुलगा. इतकेच नाही तर या पोस्टवर टीव्ही इंडस्ट्री ते अनेक सेलेब्सनी कमेंट करून आपले प्रेम व्यक्त केले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने