बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला एक महिना उलटून गेला आहे. गेल्या महिन्यामध्ये १४ जून रोजी सुशांतने आपल्या राहत्या घरी आ त्म ह त्या केली होती. सुशांतने उचललेल्या या पावलावर पहिल्यांदा कोणीही विश्वास ठेवला नव्हता. सुशांतच्या निधनासोबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता सुशांतच्या निधनाला एक महिना झाल्यानंतर सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने पहिल्यांदा आपल्या इंस्टाग्राम एकाउंट एक फोटो शेयर केला आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अंकिता पूर्णपणे सोशल मिडियावरुन गायब झाली होती. आता एक महिन्यानंतर तिने आपली पहिली पोस्ट शेयर केली आहे. सुशांतच्या निधनाने अंकिता खचली आहे आणि ती स्वतःला सावरत आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडेने सुशांतच्या निधनाच्या एक महिन्यानंतर एक दिव्याचा फोटो शेयर केला आहे. फोटोमध्ये एक दिवा देवाच्या समोर ठेवलेला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर काही फुले देखील दिसत आहेत. या फोटोला शेयर करताना अंकिताने लिहिले आहे कि देवाचा मुलगा.

अंकिताने हि पोस्ट शेयर केल्यानंतर ती सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. अंकिता आणि सुशांत दोघांचे चाहते सतत या फोटोवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. चाहते एक महिन्यापासून अंकिताच्या पहिल्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत होते.

तर अंकिताबद्दल बोलायचे झाले तर अंकिता आणि सुशांत ६ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले होते. दोघांचे वेगळे होण्याचे कारण कोणीही जाणू शकले नव्हते. अंकिताला सुशांतच्या निधनामुळे मोठा धक्का बसला होता. तर सुशांतच्या निधनानंतर अंकिता मुंबई येथील घरी त्याच्या वडिलांना भेटायला गेली होती. इतकेच नाही तर अंकिता सुशांतच्या पटना येथील घरी देखील गेली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने