बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर जवळ जवळ दीड महिन्यानंतर त्याचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला गेला आहे. या चित्रपटाची दर्शक आतुरतेने वाट पहात होते. सुशांतच्या चाहत्यांची इच्छा होती कि, सुशांतचा हा चित्रपट शेवटचा चित्रपट थियेटरमध्ये प्रदर्शित केला जावा पण कोरोना व्हायरसमुळे हे संभाव झाले नाही. जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा २ तासामध्ये हॉस्टार क्रॅश झाले. चित्रपट पाहिल्यानंतर दर्शक खूपच इमोशनल झाले आणि सोशल मिडियावर चित्रपटाबद्दल वेगवेगळ्या प्रत्रीक्रिया दिल्या जात आहे. सुशांतचा शेवटचा चित्रपट पाहून त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने देखील ट्वीट केले आहे.

अंकिताने काढली सुशांतची आठवण

सुशांतच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर अंकिता मोठ्या धक्कामधून जात आहे. तिच्यासाठी सुशांतला विसरणे खूपच कठीण जात आहे. अंकिता आणि सुशांतचे ब्रेकअप झाले होते पण दोघांमध्ये एक वेगळे नाते होते आता हेच नाते हळू हळू अंकिताला आठवत आहे. सुशांतचा शेवटचा चित्रपट अंकिताने देखील पाहिला आणि एक ट्वीट केले जे सध्या व्हायरल होत आहे.

एक शेवटच्या वेळी

अंकिता लोखंडेने सुशांतचा शेवटचा चित्रपट पाहिल्यानंतर ट्वीटमध्ये लिहिले कि, पवित्र रिश्ता पासून दिल बेचारा पर्यंत, एक शेवटची वेळ. पवित्र रिश्ता टीव्ही सिरीयलमध्ये अंकिता आणि सुशांतने बराच काळ काम केले होते आणि या सिरीयलमधून दोघे एकमेकांच्या जवळ आले होते दोघांनी बराच काळ एकमेकांसोबत घालवला आहे. सुशांतच्या निधनानंतर पवित्र रिश्ताची टीम खूपच दु:खामध्ये आहे.

आयुष्य जगायला शिकवतो सुशांतचा चित्रपट

सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाला दर्शकांकडून खूप प्रेम मिळाले. चित्रपटाच्या स्टोरीबद्दल बोलायचे झाले तर संपूर्ण चित्रपट मृत्यू आणि प्रेमाच्या अवतीभोवती फिरताना पाहायला मिळतो. चित्रपटामध्ये सुशांतने जी भूमिका (मॅनी) साकारली आहे ती भूमिका किजी बासूला प्रत्येक क्षण जगायला शिकवते.

मॅनी स्वतः दिव्यांग आहे आणि असे असून देखील किजी बासू जी थाइरॉयड कँ-सरशी सामना करत आहे दिल बेचारा तिच्या प्रत्येक स्वप्नाला पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तसे तर चित्रपटामध्ये असे अनेक डायलॉग्स आहेत जे डोळ्यामध्ये पाणी आणतात पण यामधील एक डायलॉग आहे जो तुम्ही ट्रेलरमध्ये देखील ऐकला असेल – ‘जन्म कब लेना है और मरना कब है ये हम डिसाइड नहीं कर सकते पर इसे कैसे जीना है ये तो हम डिसाइड कर सकते हैं.’

कुठे पाहाल चित्रपट

सुशांत सिंह राजपूतचा हा चित्रपट तुम्ही डिस्ने हॉटस्टारवर पाहू शकता आणि जर तुमच्याजवळ सब्सक्रिप्शन नाही आहे तरी देखील तुम्ही सुशांतचा शेवटचा चित्रपट हॉटस्टारवर विनामुल्य पाहू शकता. हा चित्रपट द फॉल्ट इन ऑर स्टार्स (२०१४) चा हिंदी रिमेक आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने