सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सतत हे जाणून घेण्याच्या प्रयत्न सुरु आहे कि त्याच्यासोबत अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली होती कि त्याने इतके मोठे पाऊल उचलले. एक सक्सेससफुल करियर असून देखील शेवटी कोण होते ते लोक जे त्याला इतका त्रास देत होते कि तो आतून खचला होता. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची भूमिका यासर्वांमध्ये खूपच संशयास्पद दिसत होती आणि आता सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंग यांनी रिया चक्रवर्ती विरुद्ध एफआईआर दाखल केली आहे कि रियाचा या घटनेशी खोल संबंध आहे.

सुशांतच्या वडिलांनी लावले आरोप

सुशांतचे वडील केके सिंह यांनी पटना, बिहार येथील पोलीस स्टेशन मध्ये एफआईआर दाखल केली आहे, या तक्रारीमध्ये रिया चक्रवर्तीवर आरोप लावण्यात आले आहेत. रियावर सुशांतच्या वडिलांचा आरोप आहे कि जर ती सुशांत सोबत राहत होती तर त्याला एकटा सोडून काही दिवसांपूर्वी घरातून का निघून गेली होती, आणि जर गेली असेल तर आपल्यासोबत घरातील महत्वाची कागदपत्रे, सुशांतचे मेडिकल पेपर्स, ज्वेलरी – पैसे सर्व काही घेऊन का गेली. त्यांनी याच्या चौकशीची मागणी केली आहे.

१५ करोड काढण्यात आले

सुशांतचे वडील केके सिंह यांनी म्हंटले कि अकाऊंटमधून ठीक एक महिन्याआधी १५ करोड रुपये ट्रांसफर केले गेले, त्या अकाऊंटमध्ये ज्याचे सुशांतशी काहीच नाते नव्हते. रियाने सांगावे कि हे पैसे तिने कोणाला पाठवले होते. केके सिंह यांनी म्हंटले कि सुशांतच्या प्रत्येक अकाऊंटची चौकशी झाली पाहिजे. सुशांतच्या वडिलांनी म्हंटले कि रिया चक्रवर्तीने त्यांच्या मुलाला आपल्या प्रेमामध्ये का अडकवले, त्याचे पैसे हडपले आणि जेव्हा सुशांतजवळ काही राहिले नाही तेव्हा ती त्याला सोडून निघून गेली.

मेडिकल स्थितीबद्दल कुटुंबाला माहिती नव्हते

सुशांतच्या वडिलांनी म्हंटले कि जर माझा मुलगा डि प्रे श नचा रुग्ण होता, औषधे घेत होता तेव्हा मला याबद्दल का सांगितले गेले नाही, मुलाच्या मेडिकल कंडीशनबद्दल कुटुंबाची संमती का घेतली नाही. ते सर्व डॉक्टर चौकशीच्या घेऱ्यात येतात. सुशांतच्या वडिलांनी रियावर हे देखील आरोप लावले कि तिने सुशांतला औषधांचा ओव्हरडोस दिला होता. सुशांतची मेडिकल कंडीशन खराब करण्याचा देखील त्यांनी आरोप लावला.

बरबाद करण्याची ध-मकी

सुशांतच्या वडिलांनी आणखीन एक आरोप करताना म्हंटले कि, सुशांतचे मन बॉलीवूडमध्ये लागत नव्हते, तो केरळमध्ये ऑर्गेनिक शेतीचे काम करू इच्छित होता, पण रिया यासाठी तयार नव्हती. तिने सुशांतला ध-मकी दिली होती कि जर त्याने असे केले तर रिया त्याच्या मेडिकल कंडीशनबद्दल सर्वांना सांगेल, त्याला वेडा सिद्ध करेल, सुशांतला बरबाद करेल. या सर्व गोष्टींमुळे सुशांत खूपच अस्वस्थ झाला होता. सुशांतचे वडील के के सिंह यांचे हे आरोप खूपच गंभीर आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने