बॉलीवूडमध्ये प्रत्येक स्टारची एक स्ट्रगल स्टोरी आहे. खासकरून आउट साइडर्ससाठी इंडस्ट्रीमध्ये स्थान मिळवणे कशाप्रकारे अवघड असते, हि गोष्ट अक्षय कुमार संबंधित एका किस्स्यावरुन समजते. अक्षय कुमारने सांगितले होते कि कशाप्रकारे ९० च्या दशकामध्ये त्याच्या हातामधून एक मोठा चित्रपट गेला होता.

हैराण करणारी गोष्ट हि आहे कि या चित्रपटासाठी अक्षयला फक्त साईनच केले नव्हते तर फोटोशूट देखील करण्यात आला होता. अक्षयने स्वतः सांगितले होते कि या चित्रपटामध्ये त्याची जागा अभिनेता अजय देवगनला देण्यात आली होती. हा तोच चित्रपट होता, ज्याद्वारे पहिल्यांदा अजय देवगनने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता.

नुकतेच बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा एक जुना मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने सांगितले आहे कि कसे त्याला चित्रपटामधून काढून रातोरात अजय देवगनला चित्रपट देण्यात आला होता. हि मुलाखत त्याने एका न्यूज वेबसाईटला खूपच दिवसांपूर्वी दिली होती.

ज्यामध्ये त्याने सांगितले आहे कि त्याला फूल और कांटे चित्रपटामधून रातोरात रिप्लेस करण्यात आले होते. अक्षयने सांगितले कि मी १९९१ मध्ये रिलीज झालेल्या फूल और कांटे चित्रपटामध्ये होतो. मी या चित्रपटाच्या गाण्याच्या मेकिंगमध्ये, फोटोशूट्स मध्ये आणि याशिवाय इतर अनेक ठिकाणी उपस्थित होतो.

अक्षयने पुढे सांगितले कि शुटींगच्या आदल्या रात्री जेव्हा मी तयारी करत होतो तेव्हा मला एक कॉल आला होता आणि मला सांगितले गेले होते कि उद्या तुम्ही शुटींग सेटवर येऊ नका, तुम्हाला रिप्लेस केले गेले आहे, आता कोणी दुसरा या चित्रपटाचा हिरो आहे. या चित्रपटामधून अभिनेता अजय देवगनने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता.

तथापि, आज अक्षय कुमार आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलीवूडमध्ये एक मोठा स्टार बनला आहे. तो एका वर्षामध्ये अनेक चित्रपट करतो आणि त्याचे सर्वच चित्रपट सुपरहिट होतात. येणाऱ्या काळामध्ये अक्षय कुमार सूर्यवंशी, लक्ष्मी बॉम्ब, बच्चन पांडे आणि बेल बॉटम सारख्या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने