सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे लॉकडाउन सुरु आहे. अशामध्ये सर्वजण आपल्या घरामध्ये वेळ घालवत आहेत. सेलेब्सदेखील यामध्ये मागे नाहीत. तेदेखील घरामध्येच आहेत. सामान्य लोकांपासून ते सेलेब्स पर्यंत सर्वजण आपल्या गरजेनुसार बाहेर पडत आहेत. अशामध्ये सेलेब्ससंबंधित अनेक किस्से, स्टोरीज, फोटोज आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

यादरम्यान अजय देवगनच्या सिंघम चित्रपटाला ९ वर्षे पूर्ण झाले आहेत. हा चित्रपट २२ जुलै २०११ रोजी प्रदर्शित झाला होता. रोहित शेट्टीच्या या चित्रपटामध्ये काजल अग्रवाल देखील मुख्य भूमिकेमध्ये होती. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या निमित्ताने आम्ही अजय देवगनच्या युनिक आणि स्टाइलिश व्हॅनिटी व्हॅनचेचे काही फोटो दाखवणार आहोत.

अजय देवगनची स्टाइलिश आणि अनोखी व्हॅनिटी व्हॅन त्याच्या आलिशान घराइतकीच अनोखी आहे. हि व्हॅन बाहेरून जितकी अनोखी दिसते तितकीच ती आतून देखील अनोखी आहे. अजयने आपली व्हॅनिटी व्हॅन खास प्रकारे डिझाईन करून घेतली आहे. यामध्ये एखाद्या आलिशान घराइतक्याच सुविधा आहेत. अजयने आपल्या व्हॅनिटी व्हॅनला स्पोर्ट लुकमध्ये तयार करून घेतले आहे. जी दिसायला इतर अन्य व्हॅनिटी व्हॅनपेक्षा खूपच वेगळी आहे.

या व्हॅनिटी व्हॅनला गुजरातच्या एका डिझाईनरने बनवले आहे, यामध्ये एक कीचन देखील. व्हॅनमध्ये बेडरूम, सिटींग रूम, मिनी बार, लाऊंज आणि जिम देखील आहे. अजयच्या चित्रपटामध्ये अॅकक्शन सीन जास्त असतात त्यामुळे त्याला नेहमी फिट राहावे लागते आणि फिटनेसची काळजी घेणे खूपच आवश्यक आहेत. यामुळे सिंघम २ च्या शुटींग दरम्यान त्याने आपल्या व्हॅनिटी व्हॅनलाच जिम बनवले होते आणि आपल्या व्यस्त शेड्युलमध्ये तो व्हॅनमध्ये जिम करत होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने