बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये कलाकारांना चित्रपटांमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका साकाराव्या लागतात. काही कलाकार असे आहेत ज्यांनी आपल्या भूमिकांनी लोकांच्या मनावर छाप पाडली. काही अभिनेत्रींनी चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली आणि खूपच लोकप्रियता मिळवली. आज आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारून खूपच लोकप्रियता मिळवली होती.

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्राने आपल्या लग्नाच्या अगोदर दोन चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली होती. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या मेरी कॉम चित्रपटामध्ये आणि २०१५ मध्ये बाजीराव मस्तानी चित्रपटामध्ये तिने आईची भूमिका साकारली होती.

अमीषा पटेल

अमीषा पटेल आज भलेही चित्रपटांपासून दूर आहे. पण तिने २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या गदर चित्रपटामध्ये आईची भूमिका साकारली होती.

जॅकलिन फर्नांडिस

जॅकलिन फर्नांडिसने २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्रदर्स चित्रपटामध्ये अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये तिने एका मुलीच्या आईची भूमिका साकारली होती. हा चित्रपट लोकांना खूपच पसंत आला होता.

यामी गौतम

यामी गौतम खऱ्या आयुष्यामध्ये अजून अविवाहित आहे. पण बदलापूर चित्रपटामध्ये तिने एका मुलाच्या आईची भूमिका साकारली होती.

दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोणने देखील लग्नाच्या अगोदर आईची भूमिका साकारली आहे. ती २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या बाजीराव मस्तानी चित्रपटामध्ये आई बनलेली पाहायला मिळाली होती.

ऋचा चड्ढा

ऋचा चड्ढाचे अजून लग्न झालेले नाही. पण २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या गँग्स ऑफ वासेपुर २ मध्ये तिने एका आईची भूमिका साकारली होती.

कॅटरीना कैफ

कॅटरीना कैफने २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या न्यूयॉर्क चित्रपटामध्ये एका आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटामधील तिची आईची भूमिका लोकांना खूपच आवडली होती. कॅटरीना अजूनपर्यंत अविवाहित आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने