बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्याने आपल्या बांद्रा येथील घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुशांतचे नाव बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्यांमध्ये सामील होते, ज्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर टीव्हीपासून बॉलीवूडपर्यंतचा प्रवास केला होता. सुशांतने आपल्या फिल्मी करियरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. चला तर जाणून घेऊया त्याला कोणत्या सिरीयल मधून ओळख मिळाली होती.


२००० मध्ये सुशांतच्या वडिलांची दिल्ली येथे बदली झाली आणि सुशांतसुद्धा त्यांच्यासोबत दिल्लीला आला. अभ्यासामध्ये हुशार असलेल्या सुशांतने इंजीनियरिंग करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे शिक्षण घेताना सुशांतला वाटले कि काही एक्स्ट्रा अॅक्टिविटी केली पाहिजे. यानंतर त्याने श्यामक डावरचा डांस ग्रुप जॉईन केला, ज्याद्वारे त्याने देश-विदेशामध्ये अनेक शो केले.२१ जानेवारी १९८६ रोजी पटना मध्ये जन्मलेल्या सुशांतने टेलीव्हिजन पासून चित्रपटांपर्यंतचा प्रवास केला. सुशांतने आपल्या करियरची सुरुवात २००८ मध्ये टीव्ही सिरीयल किस देश में है मेरा दिल मधून केली होती. पण त्याला एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या सिरीयलमधून खरी ओळख मिळाली.पवित्र रिश्ता सिरीयलमध्ये सुशांतसोबत अभिनेत्री अंकिता लोखंडे देखील पाहायला मिळाली होती. या सिरीयलमुळे त्याला विशेष ओळख मिळाली. दर्शकांनी त्याला या शोमध्ये खूपच पसंत केले. यानंतर सुशांतने २०१३ मध्ये काय पो छे चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटामध्ये सुशांतच्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले होते.


पहिल्याच चित्रपटापासून दर्शकांच्या आणि समीक्षकांच्या कौतुकाचा धनी झालेल्या सुशांतने रोमँटिक, विनोदी, नाटक, थ्रिलर, क्रीडा इत्यादी प्रकारच्या सर्व चित्रपटांमध्ये काम केले. येथून सुशांतचे नशीब पालटले आणि त्याला घरा-घरामध्ये ओळखले जाऊ लागले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने