बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आता आपल्यामध्ये नाही राहिला पण तो त्याच्या उत्कृष्ठ अभिनयाच्या जोरावर सर्वांच्या हृदयामध्ये बसला आहे. सुशांत सिंह चित्रपटांमधील अभिनयासोबत लवकरच निर्माता म्हणून समोर येणार होता. त्याचा सेल्फ स्टारर वंदे भारतम हा चित्रपट तो एक निर्माता म्हणून बनवणार होता आणि या चित्रपटाद्वारे तो एक निर्माता म्हणून सर्वांच्या समोर येणार होता.

या चित्रपटाद्वारे संदीप सिंह निर्देशक म्हणून सुरवात करणार होता, जो सुशांतचा एक चांगला मित्र देखील आहे आणि ज्याच्या खात्यामध्ये अलीगढ, सरबजीत आणि भूमि सारखे चित्रपट प्रोड्यूस करण्याचे श्रेय आहे. संदीपने शनिवारी संध्याकाळी या चित्रपटाबद्दल उल्लेख केला होता आणि चित्रपटाचे एक पोस्टर देखील शेयर होते.

संदीपने शेयर केलेल्या या पोस्टरमध्ये अभिनेता सुशांत देखील पाहायला मिळत आहे. त्याने लिहिले कि, तू मला वचन दिले होते कि आपण बिहारी भाऊ एक दिवस या इंडस्ट्रीवर राज्य करू आणि तुझ्यासारखे आणि माझ्यासारखे स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांना प्रेरित करू आणि त्यांचा सपोर्ट सिस्टम बनू.

त्याने पुढे लिहिले आहे कि तू मला वचन दिले होते कि एक निर्देशक म्हणून माझी सुरवात तुझ्यासोबत होईल, राज शांडिल्यने याला लिहिले आणि आपण दोघे याला एकत्र प्रोड्यूस करणार होतो. आता तुझ्या अश्या जाण्याने मी खचलो आहे. आता मला सांग कि मी हे स्वप्न कसे पूर्ण करेन. त्याने म्हंटले कि, मी तुला वचन देतो कि मी हा चित्रपट बनवणार आणि हा चित्रपट प्रिय सुशांत सिंह राजपूतला श्रद्धांजली असेल ज्याने लाखो लोकांना प्रेरित केले आणि एक अशा निर्माण केली कि काहीही अशक्य नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने