बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अकाली निधनामुळे पूर्ण बॉलीवूडला धक्का बसला आहे. नैराश्यामुळे त्याने आ*त्म*ह*त्या केल्याचे म्हंटले जात आहे. त्याच्या मृत्यूबद्दल अनेक उलट सुलट चर्चा होऊ लागल्या आहेत. त्यामुळे त्याच्या मृत्यूसाठी अनेक गोष्टींना जबाबदार ठरवले जात आहे.

त्याच्या अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांना दु:ख अनावर होत आहे. पण त्याची बहिण सर्वांना संयम ठेवण्याची विनंती करत आहे. सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ती अमेरिकेमध्ये असते, भावाच्या अशा अचानक जाण्याने तिला दु:ख अनावर झाले आहे. पण तरीही तिने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेयर करून सर्वांनी संयम ठेवण्याचा संदेश दिला आहे.

या पोस्टमध्ये तिने एक विशेष गोष्ट लिहिली आहे. तिच्या मुलासोबत झालेल्या संभाषणाबद्दल तिने यामध्ये लिहिले आहे. तीने लिहिले आहे कि, मी ज्यावेळी माझा मुलगा निर्वाणला म्हणाले कि तुझा मामा आता आपल्यामध्ये राहिला नाही त्यावेळी तो म्हणाल कि पण तो आपल्या हृदयामध्ये अजून जिवंत आहे. हि ओळ तो तीन वेळा म्हणाला असे देखील तिने या पोस्टमध्ये सांगितले आहे. जर एक पाच वर्षाचा मुलगा जर असे म्हणत असेल तर विचार करा आपण किती खंबीर राहायला पाहिजे, असेदेखील श्वेता यादरम्यान म्हणाली.

या पोस्टच्या माधमातून सुशांतच्या बहिणीने सुशांतच्या चाहत्यांना संदेश दिला आहे कि जरी आज तो आपल्यामध्ये नसला तरी तो आपल्या हृदयामध्ये जिवंत आहे राहील. कृपया त्याच्या आत्म्याला त्रासदायक ठरेल असे काहीही करू नका, खंबीर रहा.

रविवारी १४ जून रोजी सुशांतने या जगाचा निरोप घेतला. १५ जूनला त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बॉलीवूड मधील अनेक दिग्गज कलाकार त्याला निरोप देण्यासाठी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने