सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंह कीर्तीने काही दिवसांपूर्वी आपल्या भावाच्या आठवणीत एक इमोशनल पोस्ट लिहिली होती, जी तिने आता डिलीट केली आहे. यानंतर तिने आपले सोशल मिडिया अकाउंटसुद्धा डिलीट केले आहे. श्वेता १७ जूनला अमेरिकेहून भारतामध्ये पोहोचली होती. ती आपल्या भावाच्या अं ति म सं स्का रा मध्ये सामील होऊ शकली नव्हती.

श्वेता १८ जूनला पटनामध्ये सुशांतच्या अस्थि विसर्जन संस्कारामध्ये सामील झाली होती. तिने आपल्या फेसबुक अकाऊंटवर सुशांतसाठी एक इमोशनल पोस्ट लिहिली होती जी तिने डिलीट केली आहे. तिने या पोस्टसोबत एक कार्ड देखील शेयर केले होते जे सुशांतने कधी तिच्यासाठी लिहिले होते.

श्वेताने आपल्या पोस्टमध्ये भावासाठी लिहिले होते कि – माझे बाळा, माझ्या सोन्या आता आपल्यामध्ये शारीरिक रूपाने नाही, पण मला माहित आहे कि तू खूपच वेदनेमधून जात होतास, तरी देखील तू धैर्याने लढलास. मला माफ कर, माझ्या बाळा, जर मला तुझ्या वेदना घेता आल्या असत्या आणि माझा सर्व आनंद तुला देता आला असता. मी तुझ्यावर नेहमी माझ्या मुलासारखे प्रेम करीन, तू जिथे कुठे आहेस, माझ्या मुला नेहमी खुश रहा.

राविरारी १४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या मुंबई येथील बांद्रा स्थित आपल्या राहत्या घरामध्ये फा*शी घेऊन आ*त्म*ह*त्या केली होती. १५ जून रोजी त्याच्यावर अं ति म सं स्का र करण्यात आले. पोलीस सुशांतच्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने