सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सोशल मिडियावर सतत त्याचे जुने फोटो आणि व्हिडिओ शेयर केले जात आहेत. नुकतेच सुशांत सिंह राजपूत द्वारे केली गेलेली एक कमेंट समोर आली आहे, जेव्हा एका चाहत्याने विचारले होते कि सुशांतच्या अर्थ काय होतो? यावर दिवंगत अभिनेता सुशांतने उत्तर देताना लिहिले होते कि, याचा अर्थ असा होतो कि सर्व काही आणि काहीही नाही, एकाचा वेळी. सर्वात महत्वाचा भाग आहे माझ्या नावाचा मधला भाग, ज्यामध्ये माझ्या आईचे नाव आहे, उषा (s USHA nt), पहा, किती सुंदर आहे ना?

सुशांत जेव्हा १६ वर्षांचा होता तेव्हा त्याच्या आईचे निधन झाले होते. सुशांतने आपली शेवटची पोस्ट आपल्या आईची आठवण काढताना लिहिली होती. त्याने हि पोस्ट ३ जूनला सोशल मिडियावर शेयर केली होती.

सुशांतने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते, अश्रुंनी धूसर, भूतकाळ धूसर झाला, हसताना आणि एक क्षणभंगुर जीवनातील स्वप्नांमध्ये, दोघांमधील बातचीत आई. सुशांतच्या या पोस्टवर त्याच्या मित्रांनी देखील कमेंट केली होती, ज्यामध्ये त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती देखील सामील होती.

सुशांत सिंह राजपूतने टीव्ही सिरीयलमधून आपल्या करियरची सुरवात केली होती आणि नंतर त्याने फिल्मी जगतामध्ये पाऊल ठेवले. तो आपल्या पहिल्याच चित्रपटामधून दर्शकांच्या मनामध्ये स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाला होता. सुशांत शेवटचा छिछोरे चित्रपटामध्ये पाहायला मिळाला होता जो २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. सुशांतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा आहे जो २४ जुलैला प्रदर्शित होणार आहे जो पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने