सुशांत सिंह राजपूतला आपल्यामधून जाऊन जवळ जवळ दोन आठवडे झाले आहेत. सुशांत निघून गेला पण अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले. त्याच्या जाण्याच्या दु:खामधून त्याचे कुटुंबीय आणि चाहते अजून बाहेर आलेले नाहीत. यादरम्यान सुशांतच्या कुटुंबाने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये त्यांनी आपल्या लाडक्या गुलशन म्हणजेच सुशांतला निरोप दिला आहे. सुशांतचे कुटुंबीय त्याला गुलशन म्हणून संबोधत होते.

निवेदनामध्ये लिहिले आहे कि अलविदा सुशांत, जगासाठी जो सुशांत सिंह राजपूत होता तो आमच्यासाठी आमचा लाडका गुलशन होता. तो नेहमी मुक्त मनाचा, बोलका आणि खूपच समजदार मुलगा होता. त्याची प्रत्येक गोष्टीमध्ये रुची होती. त्याची स्वप्ने कधी कोणत्या गोष्टीसाठी थांबली नाहीत आणि त्याने सिंहाच्या अंत:करणाने त्यांचा पाठलाग केला. तो मुक्तपणे हसत असायचा.

पुढे लिहिले आहे कि तो आमच्या कुटुंबासाठी गौरव आणि प्रेरणा होता. सुशांतची आवडती वस्तू टेलिस्कोप होती, ज्याद्वारे तो आकाशातील तारे पाहत होता. त्यांनी लिहिले कि आता अजूनदेखील यावर विश्वास होत नाही आहे कि आता आम्ही कधीच त्याचे हसू ऐकू शकणार नाही.

त्याचे चमकते डोळे पाहू शकणार नाही आणि विज्ञानासंबंधी त्याचे कधीही न संपणारे बोल आता आम्ही ऐकू शकणार नाही. त्याच्या जाण्याने आमच्या कुटुंबामध्ये जी जागा रिक्त झाली आहे कि कधीच भरून निघणार नाही. तो आपल्या प्रत्येक चाहत्यावर खुप प्रेम करत होता.

आपल्या निवेदनामध्ये सुशांतच्या कुटुंबाने लिहिले आहे कि ते सुशांतच्या आठवणीमध्ये सुशांत सिंह राजपूत फाउंडेशन बनवणार आहेत. त्याने लिहिले आहे कि गुलशनला प्रेम देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. सुशांतच्या आठवणी आणि त्याच्या वारशाला सन्मान देण्यासाठी त्याचे कुटुंब सुशांत सिंह राजपूत फाउंडेशनचे निर्माण करणार आहे.

यामध्ये ते सुशांतचे आवडते क्षेत्र चित्रपट, विज्ञान आणि स्पोर्ट्समधून येणाऱ्या तरुणांना सपोर्ट करणार आहेत. यासोबत ते पटना येथे स्थित त्याच्या घराला स्मारकात बदलणार आहेत. जिथे सुशांतच्या वस्तू त्याची पुस्तके, त्याची दुर्बीण, फ्लाइट सिम्युलेटर ठेवणार आहेत. याद्वारे सुशांतचे चाहते त्याच्याशी नेहमी जोडलेले राहतील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने