बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अचानक सु सा ई डमुळे बॉलीवूडमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. इंडस्ट्रीमध्ये सध्या नेपोटिज्म बद्दल तीव्र चर्चा सुरु आहे. लोकांचे म्हणणे आहे कि बॉलीवूडमध्ये स्टार किड्सला खूपच महत्व दिले जाते तर आउट साइडर्सला कोणी विचारत देखील नाही. तथापि, काही अशी नावे देखील आहेत ज्यांनी गॉडफादरशिवाय बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले आणि बॉलीवूडमध्ये मोठे नाव कमवले.

सुशांत सिंह राजपूत

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आता या जगामध्ये नाही. पण सुशांतसुद्धा एक असा कलाकार होता जो या लिस्टमध्ये सामील आहे. ज्याने गॉडफादरशिवाय फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आणि आपली एक ओळख निर्माण केली. सुशांतच्या जाण्याचे दुख प्रत्येकाला आहे. ज्यामुळे नेपोटिज्स मुद्दाही खूपच चर्चेमध्ये आला आहे.

शाहरुख खान

बॉलीवूडचा किंग खानने टेलीव्हिजनवरुन आपल्या करियरची सुरवात केली होती. शाहरुखने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आणि सर्वाना वेडे केले. आज शाहरुख गॉडफादरशिवाय बॉलीवूडवर राज्य करत आहे. तथापि शाहरुख २०१८ मध्ये आलेल्या जीरो चित्रपटानंतर कोणत्याही चित्रपटामध्ये पाहायला मिळाला नाही.

विद्या बालन

हम पाच या टेलीव्हिजन मधून आपल्या करियरची सुरवात करणारी अभिनेत्री विद्या बालनने काही बंगाली आणि साउथ चित्रपटांमध्ये काम केले. यानंतर तिने संजय दत्त आणि सैफ अली खानसोबत परिणीता मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. आज ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये टॉप आणि वर्सटाईल अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने भूल भुलैया, द डर्टी पिक्चर, कहाणी, बेगम जान, मिशन मंगल सारख्या चित्रपटांमधून उत्कृष्ठ अभिनयाद्वारे प्रत्येकाचे मन जिंकले.

इरफान खान

इरफान खानने देखील आपल्या करियरची सुरवात शाहरुख खान आणि सुशांत सिंह राजपूतसारखे टेलीव्हिजनवरून केली होती. इरफानने बॉलीवूड मधील करियरची सुरवात सलाम बॉम्बे मधून एका छोट्याश्या भूमिकेद्वारे केली होती. त्याने अनेक चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या पण त्याला खरी ओळख मकबूल, रोग, लाईफ इन ए मेट्रो, स्लमडॉग मिलिनेयर, पान सिंह रोमर, द लंचबॉक्स मधून मिळाली. इरफानचा शेवटचा चित्रपट अंग्रेजी मिडीयम होता.

कंगना रनौत

बॉलीवूड क्वीन कंगना रनौतने १६ व्या वर्षी इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले. आज ती ज्या ठिकाणी आहे त्यासाठी तिने खूप मेहनत केली आहे. तिच्या वाटेमध्ये अनेक अडथळे आले पण तिने हार मानली नाही. कंगनाने इमरान हाशमी आणि शाइनी अहुजासोबत अनुराग बसूच्या गँगस्टर चित्रपटामधून डेब्यू केला होता. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले पण विकास बहलचा क्वीन चित्रपट तिच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. आज कंगनाला बॉलीवूडमधील सर्वात टॅलेंटड अभिनेत्रींपैकी एक मानले जाते.

अक्षय कुमार

बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी मार्शल आर्ट टीचर होता. यादरम्यान त्याच्या एका स्टूडेंटने चित्रपटांमध्ये येण्याचा सल्ला दिला. यानंतर अक्षयने बॉलीवूडचा प्रवास सुरु केला. अक्षयचा देखील कोणी गॉडफादर नाही. त्याने स्वतः बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. आज इंडस्ट्रीमध्ये अक्षयचे खूपच मोठे नाव आहे.

आयुष्मान खुराणा

आयुष्मान खुराणाचे नाव बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्यांमध्ये सामील आहे. आयुष्मान अभिनयासोबत सिंगिंग, रायटिंग देखील उत्कृष्ठ करतो. आयुष्मान रोडीज, इंडियन आयडॉल सारख्या रियालिटी शोमध्ये देखील पाहायला मिळाला आहे. यानंतर त्याने खूप स्ट्रगल करून बॉलीवूडमध्ये एंट्री केली. आयुष्मान खुराणाने बाला, ड्रीम गर्ल, बधाई हो सारखे हिट चित्रपट दिले आहेत.

नवाजुद्दीन सिद्दीकी

नवाजुद्दीन सिद्दीकी बद्दल तर आपण सर्वजण जाणतोच. त्याने आपल्या करियरची सुरवात कशी केली होती. नवाजने करियरच्या सुरवातीला शूल आणि सरफरोश सारखे चित्रपट केले होते. पण या चित्रपटांनी त्याला ओळख दिली नाही. नवाजुद्दीनला पीपली लाइव, कहानी, गँग्स ऑफ वासेपुर, द लंच बॉक्स चित्रपटामधून ओळख मिळाली.

मनोज बाजपेयी

मनोज बाजपेयीने विन्द निहलानीचा चित्रपट द्रोखाल मधून १९९४ मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर मनोज बाजपेयी बायोग्राफिकल ड्रामा बँडिट क्वीन मध्ये पाहायला मिळाले. पण मनोजला खरी ओळख शूल मधून मिळाली. मनोजला हिंदी चित्रपटांमध्ये ओळख निर्माण करण्यासाठी खूपच स्ट्रगल करावे लागले.

पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठीने आपल्या करियरची सुरवात २००४ मध्ये अभिषेक बच्चन आणि भूमिका चावला अभिनित रन मधून केली होती. या चित्रपटामध्ये त्याने चोराची भूमिका साकारली होती. पंकजने गॉडफादरशिवाय इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने