सलमान खान बॉलीवूडचा दबंग खान म्हणून ओळखला जातो. सलमानचा कोणताही चित्रपट असो तो बॉक्स ऑफिस वर १०० करोडपेक्षा जास्त कमाई करतोच. विशेष म्हणजे सलमान लोकांच्या मदतीसाठी देखील नेहमीच तयार असतो. सध्याच्या कोरोनाच्या संकटामध्ये देखील तो विविध माध्यमांच्याद्वारे लोकांची मदत करत आहे. सलमानची फॅन फॉलोविंग देखील प्रचंड मोठी असून त्याची एक झलक पाहण्यासाठी फॅन्स खूप मोठी गर्दी करत असतात.
सलमान खान कोणत्याही ठिकाणी एकटा जात नाही त्याच्यासोबत सिक्युरीटीसाठी अनेक बॉडीगार्ड तैनात असतात. पण या सर्वांमध्ये एक बॉडीगार्ड तब्बल २२ वर्षांपासून त्याचे संरक्षण करण्याचे काम करत आहे आणि तो बॉडीगार्ड म्हणजे शेरा. शेरा सलमानच्या सावलीप्रमाणे नेहमीच त्याच्यासोबत असतो. पण तुम्हाला सलमानचा बॉडीगार्ड शेराला किती पगार मिळतो माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊया.
सलमान खान सध्या आपल्या पनवेलमधील फार्म हाऊसमध्ये वास्तव्यास आहे. ईदच्या निमित्ताने सलमानने आपला बॉडीगार्ड शेरासोबत एक फोटो सोशल मिडियावर शेयर केला होता. शेराचे खरे नाव गुरमीत सिंह जौली असे आहे, जो गेल्या २२ वर्षांपासून सलमानचे संरक्षण करण्याचे काम करत आहे. सलमान देखील त्याचा बॉडीगार्ड शेराला आपल्या कुटुंबातील एक सदस्यच मानतो.
शेराला सलमानचे संरक्षण करण्यासाठी जवळ जवळ वर्षाला २ करोड रुपये इतका पगार मिळतो. म्हणजेच शेराला दर महिन्याला जवळ जवळ १६ लाख रुपये इतका पगार मिळतो. सलमानला सुरक्षित ठेवण्यासाठी शेरा अनेक वेळा रस्त्यावरून ५-५ किलोमीटर पर्यंत चालत असतो. शेराला लहानपणापासून बॉडीबिल्डिंगची खूप आवड होती.
सलमानचा बॉडीगार्ड असलेला शेरा स्वतःची एक कंपनीदेखील चालवतो जी मोठमोठ्या बिजनेसमॅन आणि बॉलीवूड कलाकारांना सुरक्षा प्रदान करण्याचे काम करते. या कंपनीचे नाव टायगर सिक्युरिटीज असे आहे. शेरा मुंबईमध्ये सलमानच्या शेजारीच राहतो त्यामुळे तो २४ तास सलमानच्या सिक्युरिटीवर लक्ष ठेऊन असतो. शेराने काही काळापूर्वी सलमानच्या सांगण्यावरून आपली एक इवेंट कंपनी विजक्राफ्ट देखील सुरु केली आहे.

याशिवाय त्याची कंपनी भारतामध्ये असणाऱ्या हॉलीवुड कलाकारांना देखील सुरक्षा प्रदान करण्याचे काम करते. शेरा सलमानच्या मित्रासारखा आहे. शेरा सलमानला भाई म्हणून बोलवत असतो. शेरा सलमानच्या सिक्युरिटीमध्ये कोणतीहि कसर सोडत नाही आणि वेळ पडल्यास तो त्याच्यासाठी आपला जीव देखील धोक्यात घालू शकतो.
सलमानच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर त्याचा राधे हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार होता पण सध्या भारतामधील कोरोनाच्या संकटामध्ये या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. त्याचबरोबर २०२१ मध्ये तो कभी ईद कभी दिवाली चित्रपटामध्ये देखील पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये पूजा हेगडे त्याच्यासोबत मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने