टीव्ही न्यूजच्या जगात अशी अनेक नावे आहेत जी खूपच लोकप्रिय झाली आहेत. असे बरेच टीव्ही न्यूज अँकर आहेत ज्यांचे सोशल मीडियावर फॅन फॉलोव्हिंग कोणत्याही बॉलिवूड सेलेब्सपेक्षा कमी नाही. या लोकांच्या लोकप्रियतेमुळे या अँकर्सनी कित्येक टीव्ही सिरियल्स आणि चित्रपटांमध्ये गेस्ट अपीयरेंस ही केले आहे. चाहत्यांना या न्यूज अँकरबद्दल बरेच काही माहिती असेल, परंतु त्यांच्या आयुष्याच्या जोडीदाराबद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे. चला तर मग जाणून घेऊया.
अंजना ओम कश्यप:- अंजना ओम कश्यप हे टीव्ही न्यूजच्या जगतातील एक प्रसिद्ध नाव झाले आहे. सोशल मीडिया वर अंजना ओम कश्यप यांचे लाखों फॉलोअर्स आहेत. आज तक चॅनेलची स्टार अँकर अंजना ओम कश्यप यांच्या पतीचे नाव मंगेश कश्यप असे आहे. मंगेश कश्यप हे सीनियर आयपीएस अधिकारी आहेत. मंगेश आणि अंजना ओम कश्यप यांना दोन मुले आहेत.
श्वेता सिंह:- हिंदी न्यूज चॅनल आज तकची अँकर आणि रिपोर्टर श्वेता सिंहच्या पतीचे नाव संकेत कोटकर असे आहे. जिथे श्वेता बिहारी भूमिहार फॅमिलीशी संबंधित आहे तर तिचा पती संकेत हा मराठी ब्राह्मण कुटुंबातील आहे. दोघांनीही लव मॅरेज केले आहे. संकेत सॉफ्टवेयर इंजीनियर आहे. संकेत आणि श्वेता यांना एक सुंदर मुलगी आहे.
रुबिका लियाकत:- एबीपी न्यूजची अँकर रुबिका लियाकतने २०१२ मध्ये नावेद कुरैशीशी लग्न केले होते. नावेद कुरैशीही पत्रकार आहेत. नावेद आणि रुबिका कधी काळी न्यूज २४ चॅनेलमध्ये एकत्र काम करत होते.
चित्रा त्रिपाठी:- आज तकची न्यूज अँकर चित्रा त्रिपाठी यांनी अतुल अग्रवाल सोबत २००८ मध्ये लग्न केले होते. अतुल अग्रवाल सुद्धा एक पत्रकार तसेच टीव्ही न्यूज अँकर आहेत. दोघांनीही लव मॅरिज केले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने