अभिनेता सुशांत सिंह राजपूत आता या जगामध्ये नाही, त्याचे चाहते त्याचे कुटुंबीय त्याच्या आठवणीसोबत पुढे जात आहेत. अभिनेत्याने गेल्या १४ जूनला आ त्म ह त्या केली आणि असे म्हंटले जाते आहे कि तो डि प्रे श न चा शिकार झाला होता. सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह यांनी सांगितले कि तो २०२१ मध्ये लग्न करणार होता. बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आ त्म ह त्या केसची मुंबई पोलीस सखोल चौकशी करत आहेत. तर सुशांतसंबंधित प्रत्येक बाबींचा शोध घेतला जात आहे ज्यामध्ये पोलिसांना थोडीदेखील शंका येत आहे.

पोलिसांना शंका आहे कि सुशांतच्या ट्विटर अकाउंटसोबत कोणीतरी छेडछाड केली आहे आणि गेल्या सहा महिन्याचे ट्वीट्स डिलीट केले आहेत. या वस्तुस्थितीचा सखोल अभ्यास करण्यासाठी पोलिसांनी ट्विटरला एक पत्र देखील लिहिले आहे. खरेतर सुशांत सिंह राजपूतच्या टि्वटर अकाउंटमध्ये गेल्या २७ डिसेंबरपासून कोणतेही ट्वीट दिसत नाही आहे. बातमीनुसार पोलिसांना याच गोष्टीची शंका आहे कि कोणीतरी सुशांतचे ट्वीट्स डिलीट तर केले नाहीत?

पोलिसांना हा संशय आहे कि सोशल मिडियावर इतके अॅक्टिव्ह असूनदेखील तो ट्विटरपासून इतके दूर कसा राहू शकतो? यामुळे पोलीस सुशांतच्या अकाऊंटची गेल्या सहा महिन्यापासून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी ट्विटरला एक पत्र देखील लिहिले आहे. ज्यामुळे त्यांना पुढील तपासासाठी सोपे जाईल. जेव्हापासून सुशांत सिंह राजपूतने आ त्म ह त्या केली आहे तेव्हापासून पोलीस या प्रकरणाच्या चौकशीसाठी दिवसरात्र एक करत आहेत.

पोलिसांनी आतापर्यंत सुशांतसंबंधित २३ लोकांची चौकशी केली आहे ज्यामध्ये सुशांतचे दोस्त, कुटुंबीय आणि काही जवळचे लोक सामील आहेत. गेल्या बुधवारी सुशांतचा फाइनल पो स्ट मा र्ट म रिपोर्ट आला आहे ज्याद्वारे स्पष्ट झाले कि त्याचा मृत्यू श्वास थांबल्यामुळे झाला आहे. पो स्ट मा र्ट म दरम्यान त्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा सापडल्या नाहीत. सध्या त्याच्या आ त ड्यां ना फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.


सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा २४ जुलैला डिजिटल प्लेटफॉर्म म्हणजेच डिज्नी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. हा सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे निर्माण करणारी कंपनी फॉक्स स्टार स्टूडियोज़‌कडून हि गोष्ट देखील जाहीर करण्यात आली आहे कि सुशांत सिंह राजपूतचा हा शेवटचा चित्रपट डिज्नी हॉटस्टारच्या सबस्क्राइबरसोबत देशभरातील नॉन सबस्क्राइबर दर्शक देखील विनामुल्य पाहू शकणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने