चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये अनेक मोठ मोठ्या कलाकारांसोबत अनेक लहान बालकलाकारांचा अभिनय देखील पाहायला मिळतो जो त्या चित्रपटाला किंवा शोला खास बनवतो. अशाच एका प्रसिद्ध सिरीयल फुलवामध्ये काम करणारी एक छोटी बालकलाकारबद्दल आज आम्ही सांगणार आहोत.
तुम्ही फुलवाचे नाव तर नक्कीच ऐकले असेल, काही दिवसांपूर्वी टीव्हीवर एक सिरीयल येत होती ज्याचे नाव फुलवा होते. या सिरीयलला लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत सर्वजण पसंत करत होते. हि सिरीयल त्यावेळी खूपच लोकप्रिय झाली होती. २०१२ मध्ये या सिरीयलचे प्रसारण बंद करण्यात आले पण आज सुद्धा हि सिरीयल त्या मुलीमुळे खूपच पसंत केली जाते. या मुलीने सिरीयलमध्ये दमदार अभिनय सादर केला होता. या मुलीचे नाव जन्नत जुबैर रहमानी आहे.
जन्नत जुबैरला खरी ओळख याच सिरीयलमुळे मिळाली होती. जन्नत जुबैरने यानंतर अनेक टीव्ही सिरीयलमध्ये काम केले होते. जन्नत जुबैर आता खूपच मोठी झाली आहे. तिचा जन्म २००२ मध्ये मुंबई येथे झाला होता. जन्नतने दिल मिल गए या सिरीयलमधून आपल्या अभिनय करियरची सुरवात केली होती.
हि सिरीयल २०१० मध्ये सुरु झाली होती. जन्नतने २०११ मध्ये अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. जन्नतने बराच काळ चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केले सध्याच्या काळामध्ये जन्नत सोशल मिडियावर खूपच अॅ क्टिव राहत असते. टिकटॉक तिचे लाखो फॅन्स आहेत. जन्नत जुबैर नेहमी गाण्यांमध्ये आणि जाहिरातींच्या पाहायला मिळत असते. तिचे फोटो पाहण्यासाठी लोक नेहमी आतुर असतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने