बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नीतू चंद्राचा जन्म २० जून १९८४ रोजी पटना मध्ये झाला होता. तिने बॉलीवूड पासून ते हॉलीवूडपर्यंत काम केले आहे. नीतू चंद्राने २००५ मध्ये अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम यांचा चित्रपट गरम मसाला मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने चित्रपटामध्ये स्वीटी नावाच्या एयर होस्टेसची भूमिका साकारली होती.

नीतू चंद्राला आपल्या करियर दरम्यान अनेक वादांचा सामाना करावा लागला. तिचे नाव मॅ*च फि*क्सिं*गच्या आरोपाखाली असलेल्या पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद असिफ याच्यासोबत जोडले गेले होते. पाकिस्तानी अभिनेत्री विना मलिकने दावा केला होता कि नीतू चंद्रा आणि मोहम्मद आसिफ एकमेकांसोबत बोलत होते.

जेव्हा कधी अभिनेत्री नीतूचा उल्लेख होतो तेव्हा या गोष्टीची चर्चा जरूर होते कि नीतू चंद्रासाठी २००९ हे वर्ष खूपच कठीण होते. तिने मासिकासाठी एक फोटोशूट केले होते ज्याचा खूपच विरोध झाला होता. यामुळे तिचे फोटोशूट बंद करावे लागले होते.

अभिनेत्री नीतू चंद्राने ताइक्वांडोमध्ये देशविदेशामध्ये भारताचे नाव उज्वल केले आहे. तिने १९९७ मध्ये वर्ल्ड ताइक्वांडो चँपियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तिने ताइक्वांडोमध्ये २ डॅन ब्लॅक बेल्ट मिळवले आहेत. अपवाद सोडून हा बेल्ट कोणत्याही खेळाडूला २ वर्षापूर्वी नाही मिळत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने