साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता राणा डग्गुबाती आणि मिहिका लवकरच विवाह बंधनामध्ये अडकणार आहेत. सध्या त्यांच्या विवाहाच्या विधी सुरु झाल्या आहेत. सर्वात प्रथम राणाचे सर्व कुटुंबीय विवाहाची पहिली विधी पूर्ण करण्यासाठी लग्न पत्रिका घेऊन मिहिका बजाज यांच्या घरी गेले. त्यानंतर विधिवत मिहीकाच्या कुटुंबियांना लग्नपत्रिका देण्यात आली. मिहीकाने नुकतेच त्यांच्या या कार्यक्रमाचे काही फोटो आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेयर केले आहेत.

लॉकडाऊन दरम्यान झाली होती दोघांची एंगेजमेंट

या पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये मिहीकाने जयंती रेड्डी यांनी खास डिझाइन केलेला मिंट ग्रीन लेहेंगा परिधान केलेला पाहायला मिळत आहेत. राणा आणि मिहिका हे ८ जूनला विवाह बंधनामध्ये अडकणार आहेत. हैदराबादच्या लक्झरी पॅलेसमध्ये या दोघांचा विवाह होणार असल्याची बातमी समोर आली आहे. याअगोदर राणा आणि मिहिका यांनी १२ मे ला आपल्या सोशल मिडिया अकाऊंट वरुन एंगेजमेंटची बातमी दिली होती. २१ मे ला दोघांची एंगेजमेंट झाली होती.

ब्रँडने दिली मिहिकाच्या लूकची माहिती

मिहिकाच्या ज्वेलरी ब्रँड करसलाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून मिहीकाच्या लुकची माहिती दिली आहे. मिहीकाने या कार्यक्रमावेळी खास पोल्कीपासून बनवण्यात आलेला नेकलेस परिधान केला होता. ज्यामध्ये १८ कॅरेट सोन्याबरोबर रुबी आणि पिंक टर्मलीनचे वर्क करण्यात आले होते. याचबरोबर खास माणिक आणि पोल्कीपासून मांग टीका बनवण्यात आला होता. त्याचबरोबर २२ कॅरेटचे ब्रेसलेट देखील मिहिकाने यावेळी घातले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने