बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाचा जितका मोठा धक्का त्याच्या कुटुंबाला बसला आहे तितकाच मोठा धक्का त्याच्या चाहत्यांना बसला आहे. सुशांत सिंह राजपूने १४ जून रोजी फा शी घेऊन आ त्म ह त्या केली होती. पोलीस या प्रकरणामध्ये चौकशी करत आहेत आणि आतापर्यंत अनेक लोकांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. अमेरिकन डांसर आणि अभिनेत्री लॉरेन गॉटलिबसुद्धा सुशांत सिंह राजपूतच्या आ त्म ह त्ये ची बातमी ऐकून हैराण झाली आहे. तिला विश्वास बसत नव्हता कि भारतामध्ये जो अभिनेता तिला सपोर्ट बनला, जो तिला इंस्पायर करत होता आणि मदतीसाठी नेहमी तयार राहत होता तो आता या जगामध्ये नाही.

लॉरेन गॉटलिबने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सुशांत सिंह राजपूतसोबत २०१६ मध्ये झालेल्या व्हॉट्सअपवरच्या संभाषणाचा एक स्क्रीनशॉट शेयर केला आहे आणि सांगितले आहे कि सुशांत किती विनम्र आणि मोठ्या मनाचा होता. या व्हॉट्सअप चॅटमध्ये सुशांतने एक टीव्ही अभिनेतासाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये असलेल्या स्ट्रगल बद्दल देखील लिहिले आहे.

लॉरेनला २०१६ मध्ये केल्या गेलेल्या या संदेशामध्ये पहिला सुशांत तिची हालचाल विचारतो आणि आपल्या चित्रपटाची माहिती देतो. यानंतर जेव्हा लॉरेन त्याला चित्रपटाबद्दल विचारते तेव्हा ती लिहिते कि, माझा चित्रपट काही आठवड्यापूर्वी प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर चांगला राहिला. आतापर्यंत हा माझा सर्वात जास्त कमाई करणारा पंजाबी चित्रपट राहिला आहे. यानंतर ती लिहिते कि मी आता काहीही साईन केलेले नाही. मला आता एक मोठा चित्रपट हवा आहे. आता मी छोट्या भूमिका नाकारत आहे. पाहूया आता कधी होते ते.

याचे उत्तर देताना सुशांतने लॉरेनला लिहिले आहे कि, तुला माहिती आहे टीव्ही पासून चित्रपटांपर्यंत येणे खूप अवघड होते, पण माझ्या चॉइसमुळे सर्वाइव करू शकलो. पहिला स्वतःला कन्विन्स करावे लागते. जर माझ्यासारखा एक अवरेज लुकिंग मुलगा, अवरेज टॅलेंट इथे स्थान बनवू शकतो तर समजून जा काहीही संभव आहे. तुझ्याजवळ तर सर्वकाही आहे. टॅलेंट आहे, कॅलिबर आहे. मी फक्त चांगला आहे कारण माझ्या आसपास जास्तकरून अवरेज आहे. पण माझ्यासाठी खूपच लांबचा प्रवास आहे.

सुशांतसोबत व्हॉट्सअपवर झालेल्या या संभाषणाचा स्क्रीनशॉट शेयर करताना लॉरेनने इंस्टाग्रामवर लिहिले आहे कि आज फाइनली सुशांतसोबत इतक्या वर्षानंतर व्हॉट्सअपवर संभाषणावर नजर गेली. संदेश पाहिल्यानंतर मला संभाषणाचा तो भाग मिळाला त्याने पुन्हा एकदा माझे हृदय तोडले. त्या संभाषणामध्ये एकमेकांच्या स्वप्नांसाठी इतके प्रेम, आपुलकी, विनम्रता खूप भरलेली होती. मला सुशांतसोबत एक खोल कनेक्शन वाटत होते कारण आम्ही दोघेही इंडस्ट्रीमध्ये बाहेरचे होतो.

मला हे चॅट शेयर करायची इच्छा होती कारण आपल्या सर्वाना हि आठवण करून द्यायची आहे कि सर्वांसोबत याच प्रेमाने आणि सपोर्टने ट्रीट करायचे आहे, जसे सुशांत करत होता. मी आसपास खूप निगेटिवीटी आहे द्वेष पाहत आहे. मला तुम्हाला हे सांगायचे नाही कि शोक कसा करावा कारण या आठवड्यामध्ये माझी परिस्थिती खूप वाईट आहे. पण मला वाटते कि सुशांतच्या वारसाचा सन्मान करण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे BE THE BRIGHT, BEAUTIFUL, LOVING LIGHT. हे जग सुशांतच्या विन्रम हृदयामुळेच एक राहण्यालायक जागा आहे.

सुशांतच्या निधनाने दु:खी झालेल्या लॉरेन गॉटलीबने सुशांतसंबंधित एक जुनी आठवण शेयर केली होती, जेव्हा तिची सुशांतशी झलक दिखला जाच्या सेटवर पहिली भेट झाली होती आणि नंतर सुशांतने तिला त्याचे एक गाणे कोरियोग्राफ करण्यासाठी सांगितले होते. लॉरेनने सुशांत स्टारर चित्रपट डिटेक्टिव ब्योमकेश बख्शी मध्ये एक स्पेशल साँग देखील केले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने