सुशांत सिंहच्या निधनानंतर बॉलीवूडमध्ये चालू असलेल्या नेपोटिज्मवर खूपच जोरदार चर्चा सुरु आहे. अशा परिस्थितीमध्ये बॉलीवूडमधील मोठ्या नावांचा खुलासा होऊ लागला आहे. अशामध्ये बॉलीवूडसुद्धा दोन भागामध्ये विभागला गेला आहे. एक हिस्सा जिथे बॉलीवूडमधील काळे सत्य उजागर करत आहे तर दुसरा हिस्सा सोशल मिडिया निगेटिव्ह म्हणत यापासून दूर होऊ लागला आहे, याचे ताजे उदाहरण म्हणजे सोनाक्षी सिन्हा.

यादरम्यान म्युजिक इंडस्ट्रीबद्दल सोनू निगमने युध्द सुरु केले आहे. त्याने म्युजिक इंडस्ट्रीमध्ये होणाऱ्या भेदभावाबद्दल आणि गटबाजीबद्दल खुलासे केले आहेत. अशामध्ये सोनू निगमने म्यूजिक कंपनी टी-सीरीजचे मालक भूषण कुमारवर तगडा निशाणा साधला आहे.

सोनू निगमने आपला एक व्हिडिओ शेयर केला आहे ज्यामध्ये त्याने भूषण कुमारला एक्सपोज़ करण्याची गोष्ट म्हंटली आहे. इतकेच नाही तर त्याने एक अभिनेत्री आणि मॉडेल मरीना कुवरबद्दल खुलासा करण्याची गोष्ट म्हंटली आहे. या गोष्टीवरून मरीना सध्या खूप चर्चेमध्ये आली आहे. प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे कि मरीना कुवर कोण आहे? आज आम्ही तुम्हाला तिच्याबद्दल सांगणार आहोत.

मरीना कुवर एक मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री आहे. २०१७ मध्ये ती डेरा सच्चा सौदाचे राम रहीममुळे खूप चर्चेमध्ये आली होती. तिने खुलासा केला आहे कि जेव्हा ती राम रहीमला भेटायला गेली होती तेव्हा राम रहीमने तिला ज्याप्रकारे मिठी मारली होती. त्यावेळी तीला अस्वस्थ जाणवू लागले होते. त्याचबरोबर तिने राम रहीमवर चुकीच्या प्रकारे स्पर्श केल्याचा आरोप देखील लावला होता.

इतकेच नाही तर मरीनाने हे देखील सांगितले होते कि एकदा राम रहीम तिला आपल्या बेडरूममध्ये घेऊन गेला आणि म्हणाला कि पैसे आणि कशाचीही चिंता करण्याची गरज नाही. ऑगस्ट २०१७ मध्ये डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहीमला दोन साध्वींच्या रे पमध्ये दोषी ठरवून २० वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली गेली होती. यानंतर जेव्हा राम रहीमला जेलमध्ये पाठवले गेले तेव्हा मरीना कुवरने राम रहीमचे सर्व काळे कारनामे उघड केले होते.

नुकतेच सोनू निगमने आपल्या सोशल मिडिया अकाऊंट वरून एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये त्याने बॉलीवूडमधील अनेक लोकांची नावे न घेता आरोप लावले आहेत. आपल्या या व्हिडिओमध्ये त्याने हे देखील सांगितले आहे कि त्याच्याविरुद्ध चुकीच्या बातम्या दाखवल्या जात आहेत. इतकेच नाही तर त्याने भूषण कुमारला त्याच्याशी पंगा न घेण्याची देखील गोष्ट म्हंटली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने