दिव्या भारतीला बॉलीवूड इंडस्ट्रीमधील सर्वात सुंदर अभिनेत्री मानले जाते. खूपच कमी वयात प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भारतीने सफलता मिळवली होती, जी प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा असते. परंतु दिव्या भारतीने ५ एप्रिल १९९३ रोजी वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. दिव्या भारतीने अनेक सुपरहिट चित्रपट बॉलीवूडला दिले. आपल्या छोट्या करियरमध्ये तिने १२ चित्रपटांमध्ये काम केले.
दिव्या भारतीच्या निधनाचे रहस्य आज देखील उलघडलेले नाही. दिव्या भारतीचे निधन तिच्या घरातील बालकनी मधून खाली पडून झाले होते. हि आत्महत्या आहे कि खून याचा छडा आजदेखील पोलीस लावू शकलेले नाही. दिव्या भारतीने १० में १९९२ रोजी साजिद नाडियाडवाला लग्न केले होते.
इतकेच नव्हते तर लग्नासाठी दिव्या भारतीने धर्मपरिवर्तन देखील केले होते. दिव्या भारतीने मुस्लीम धर्म स्वीकारला होता. काही लोकांनी साजिद नाडियाडवाला वर हा आरोप देखील लावला होता कि दिव्या भारतीच्या हत्येचा कट त्यानेच रचला होता. पण पोलिसांना याचा कोणताही पुरावा मिळू शकला नाही. आणि शेवटी १९९८ मध्ये दिव्या भारतीची हि केस बंद करण्यात आली.
दिव्या भारतीने खूपच कमी वयामध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरवात केली होती. वयाच्या १६ व्या वर्षी तिने आपला पहिला चित्रपट केला होता. तिने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने लोकांना आपले दिवाने केले होते. फक्त ३ वर्षातच ती बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये टॉपची अभिनेत्री बनली होती. तिची तुलना मोठ मोठ्या अभिनेत्रींच्या सोबत होऊ लागली होती. परंतु अचानक तिचे निधन झाल्याने तिच्या चाहत्यांना आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने