सुक्या मेव्यामध्ये बदाम सर्वात महत्वाचा मानला जातो. असे म्हंटले जाते कि दररोज अनुशापोटी दोन-तीन बदाम खाल्याने शरीरातील सर्व रोग दूर होतात. बदाम खाल्ल्याने बुद्धी खूप तल्लख होते. बदामामध्ये अनेक पौष्‍टिक तत्व आढळतात. त्यात प्रथिने, वसा, जीवनसत्त्वे आणि खनिज पदार्थ पर्याप्त प्रमाणात आढळतात.

लहान बदामामध्ये अनेक गुण लपलेले असतात ज्याच्याबद्दल आपल्या माहित नसते. यामध्ये फायबर, प्रथिने फॅट, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात आढळतात. याशिवाय बदामामध्ये कॉपर व्हिटॅमिन बी २ आणि फॉस्फरस देखील असते. बदामामध्ये कॅलरी, कार्बोहायड्रेटेड झिंक आणि ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड देखील मोठ्या प्रमाणात आढळतात.

बदाम खाण्याचे फायदे

जर तुम्ही दररोज भिजलेले बदाम खाल्ले तर यामुळे आपली चरबी झपाट्याने कमी होती. कारण त्यामध्ये असणारे मोनोसेच्युरेटेड फॅट आपली भूक रोखण्याचे आणि पोट बराच वेळ भरलेले असल्याची भावना निर्माण करते.

जर आपण ७ दिवस नियमित अनुशापोटी बदाम खाल्लेत तर कंबरदुखीची समस्या दूर होईल. बदाम कंबरदुखीसाठी रामबाण उपाय आहे.

बद्धकोष्ठतेपासून मुक्ति मिळवण्यासाठी दररोज सकाळी अनुशापोटी ४ ते ५ बदाम खाल्ले पाहिजेत आणि भरपूर पाणी पित राहिले पाहिजे.

बदामाचे चूर्ण बनवून दुधात मिसळून संपूर्ण शरीराला लेप देऊन सकाळी कोवळे ऊन दिल्यास शरीरातील थकवा दूर होतो आणि त्वचा मुलायम तजेलदार व निरोगी बनते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने