बॉलीवूडचा दबंग सलमान खानने बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. २००३ मध्ये प्रदर्शित झालेला तेरे नाम चित्रपट त्याच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. सतीश कौशिक दिग्दर्शित या चित्रपटामध्ये सलमान खानसोबत भूमिका चावला मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळाली होती.सलमान खानच्या या चित्रपटामध्ये त्याने साकारलेल्या राधेच्या भूमिकेला दर्शकांकडून चांगलीच दाद मिळाली होती. पण त्याचबरोबर भूमिका चावलाच्या निर्जला या भूमिकेसाठी देखील भूमिका चावलाचे खूपच कौतुक झाले होते. या चित्रपटामध्ये राधे म्हणजेच सलमान खान आणि निर्जरा म्हणजे भूमिका चावला यांची लव्ह स्टोरी दाखवण्यात आली होती.


तेरे नाम चित्रपटामध्ये निर्जराच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळालेली अभिनेत्री भूमिका चावला या चित्रपटानंतर बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधून अचानक गायब झाली. २१ ऑक्टोबर २००७ मध्ये तिने तिचा बॉयफ्रेंड आणि योगा टीचर भारत ठाकूर सोबत लग्न केले. लग्नानंतर तिने बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधून काढता पाय घेतला.भूमिकाने साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनय करियरची सुरुवात केली होती. यादरम्यान तिला तेरे नाम या चित्रपटामध्ये सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. भूमिका चावला पंजाबी कुटुंबाशी संबंधित असून युवाकुडु हा तिचा पहिला चित्रपट होता.भूमिकाने तेलगू, तमीळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी व पंजाबी अशा इतर अनेक भाषांच्या चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. अत्यंत कमी काळामध्ये तिने साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली एक ओळख निर्माण केली होती. कुशी या चित्रपटामधील तिच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पुरस्कार देखील मिळाला होता जो २००१ मध्ये प्रदर्शित झाला होता.


२००४ मध्ये ती रण चित्रपटामध्ये अभिषेक बच्चनसोबत मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळाली होती. परंतु हा चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर ती पुन्हा सलमान खानसोबत सिलसिले आणि दिल जो भी कहे या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली.२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या गांधी-माई फादर या चित्रपटानंतर ती बॉलीवूडमधून गायब झाली. त्यानंतर तीने २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या एमएस धोनी: द अनटोल्ड लव स्टोरी या चित्रपटामधून बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुनरागमन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने