बॉलीवूड अभिनेत्री आपल्या सौंदर्यासाठी आणि अभिनयासाठी ओळखल्या जातात. बऱ्याच अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी पडद्यावर नेहमीच रोमँटिक आणि हिरोच्या प्रेमिकेची भूमिका साकारली आहे. तर काही अभिनेत्री चित्रपटांमध्ये निगेटिव भूमिका साकारून खूपच चर्चेमध्ये राहिल्या आहेत. अशामध्ये आज आपण अशा अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी अचानक आपली रोमँटिक भूमिका सोडून विलनची भूमिका साकारली होती.

काजोल

काजोल नेहमी लोकांच्या हृदयावर राज्य करत आली आहे. १९९७ मध्ये तिने गुप्त चित्रपटामध्ये सिरीयल किलरची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये तिने लोकांना आपल्या अभिनयाने हैराण केले होते. या चित्रपटामध्ये तिने आपल्या सिरीयल किलरच्या भूमिकेने खूप धुमाकूळ घातला होता.

रेखा

रेखाला बॉलीवूडमधील सदाबहार ब्युटी म्हणून ओळखले जाते. तिने आपल्या करियरमध्ये न विसरता येणाऱ्या मॅडम मायाची भूमिका साकारली होती. अक्षय कुमारच्या खिलाडियों का खिलाडी चित्रपटामध्ये तिने हि भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि रविना टंडनदेखील मुख्य भूमिकेमध्ये होते.

प्रियांका चोप्रा

प्रियांका २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या एतराज चित्रपटामध्ये विलनची भूमिका साकारून खूपच चर्चेमध्ये राहिली होती. या चित्रपटामध्ये ती अक्षय कुमारच्या आयुष्याची शत्रू बनते, आणि त्याचे जगणे कठीण करते. या चित्रपटामध्ये करीना कपूरने अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

कंगना रनौत

बॉलीवूड क्वीन कंगना रनौतने हृतिक रोशनच्या कृश ३ चित्रपटामध्ये विलनची भूमिका साकारली होती. या चित्रपटामधील कायाच्या भूमिकेमुळे ती खूपच चर्चेमध्ये राहिली होती. या चित्रपटामध्ये विवेक ओबेरॉय, हृतिक रोशन आणि प्रियांका चोप्रा देखील होते.

माही गिल

अभिनेत्री माही गिलने साहेब बीबी और गँगस्टर ३ चित्रपटामध्ये विलनची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये तिने आपल्या अभिनयाचे उत्कृष्ठ प्रदर्शन केले होते. या चित्रपटामध्ये जिम्मी शेरगिल देखील मुख्य भूमिकेमध्ये होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने