बॉलीवूड असो किंवा टॉलीवूड अशा खूप अभिनेत्री आहेत ज्या आपल्या सौंदर्याने सर्वानाच घायाळ करत असतात. अशा अभिनेत्रींनी आपली एक चांगली ओळख फिल्मी जगतामध्ये निर्माण केली आहे. यापैकी काही अभिनेत्री अशा आहेत ज्या आपल्याला चित्रपटामध्ये एख्याद्या वृद्ध महिलेच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात परंतु त्या खऱ्या आयुष्यामध्ये त्यापेक्षा खूपच सुंदर आणि ग्लॅमरस असतात. अशाच काही अभिनेत्रींबद्दल आपण या लेखामध्ये माहिती घेणार आहोत ज्या चित्रपटामध्ये दिसतात तर वृद्ध परंतु खऱ्या आयुष्यामध्ये आहेत खूपच सुंदर.


१. मेहर विज

सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट बजरंगी भाईजान तर सर्वानीच पाहिला असेत. या चित्रपटामध्ये मुन्नीच्या आईची भूमिका अभिनेत्री मेहर विजने साकारली होती. चित्रपटामध्ये ती आपल्याला खूपच साधरण भूमिकेमध्ये पाहायला मिळाली होती परंतु खऱ्या आयुष्यामध्ये ती खूपच सुंदर आणि ग्लॅमरस आहे.


२. अमृता सुभाष

रणवीर सिंगचा गली बॉय ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. हा चित्रपट ऑस्करसाठी सुद्धा नॉमिनेट झाला आहे. या चित्रपटामध्ये अमृता सुभाषने गली बॉय रणवीर सिंगच्या आईची भूमिका साकारली होती. चित्रपटामध्ये ती एखाद्या टिपिकल भारतीय स्त्री सारखी दिसत होती पण अमृता सुभाषच्या खऱ्या आयुष्यातील फोटो पाहिलेत तर ती दिसायला खूपच सुंदर आहे.


३. नादियासाउथ फिल्म इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध नाव म्हणजे नादिया. नादियाने अनेक चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली आहे. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट मिर्चीमध्ये तिने प्रभास च्या आईची भूमिका साकारली होती. अनेक चित्रपटांमध्ये जरी ती आपल्याला आईच्या भूमिकेत दिसत असली तरी ती खऱ्या आयुष्यामध्ये तितकीच सुंदर आहे.


४. राम्या कृष्णन


बाहुबली चित्रपटामध्ये बाहुबलीच्या सावत्र आईची भूमिका साकारून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली राम्या कृष्णनला आज कोण ओळखत नाही असे नाही. तिच्या काळामध्ये राम्या खूपच सुंदर होती आजही ती तितकीच सुंदर आहे. राम्यानेहि अनेक चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली आहे.


५. अर्चना जोइस


२०१९ मध्ये प्रदर्शित झालेला केजीएफ बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. या चित्रपटामध्ये रॉकी म्हणजेच यशच्या आईची व्यक्तिरेखा मनाला चटका लावणारी अशी होती. हि व्यक्तिरेखा एका कष्टाळू महिलेची दाखवण्यात आली होती जी आपल्या मुलाचे संगोपन करण्यासाठी प्रत्येक परिस्थितीशी सामना करत होती. चित्रपटामध्ये जरी ती आपल्याला साध्या महिलेच्या भूमिकेमध्ये दिसली असली तरी खऱ्या आयुष्य ती खूपच हॉट आणि ग्लॅमरस आहे. अर्चना हि अवघ्या २५ वर्षांची आहे आणि खूपच अट्रैक्टिव आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने