पोलिसांच्या वर्दीमध्ये आपण अनेक अभिनेत्यांना पाहिले असेल. मग तो बॉलीवूडचा सिंघम असो किंवा बॉलीवूडचा दबंग सलमान खान. सर्व अभिनेते आपल्या पोलिसांच्या वर्दीमध्ये खूपच हँडसम दिसतात. परंतु कधी तुम्ही हे देखील पाहिले असेल कि बॉलीवूडच्या अभिनेत्रीसुद्धा पोलिसांच्या वर्दीमध्ये काही कमी दिसत नाही. या लेखामधून आपण अशा अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत ज्या पोलिसांच्या वर्दीमध्ये खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसतात.


१. प्रियांका चोपडा


प्रियांका चोपडा आज बॉलीवूडमधी एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बॉलीवूड असो किंवा हॉलीवूड दोन्हीही इंडस्ट्रीमध्ये तिने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. जर तिच्या पोलीसवाल्या भूमिकेबद्दल बोलायचे झाले तर जंजीर या चित्रपटामध्ये पोलिसांच्या वर्दीमध्ये ती आपल्याला दिसली होती. ज्या चित्रपटामध्ये ती जास्त कमाल नाही दाखवू शकली. परंतु नंतर आलेल्या गंगाजल या चित्रपटामधील तिची पोलिसांची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती.


२. काजल अगरवाल


साउथच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी काजल अगरवाल हि एक अभिनेत्री आहे. काजल ने साउथच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये पोलिसांची भूमिका साकारली आहे. काजलला पोलिसांची वर्दी खूपच चांगली दिसते.


३. तब्बू


द्रीशम या अजय देवगनच्या चित्रपटामध्ये आपल्याला तब्बू पोलिसांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाली होती. या चित्रपट ती खूपच फिट आणि अग्रेसिव पाहायला मिळाली होती. या चित्रपटामध्ये जिथे अजय देवगन खरे काय आहे ते लपवण्याचा प्रयत्न करत असतो तर तब्बू खरे काय आहे ते उघड करण्याचा प्रयत्न करत असते. या चित्रपटामधील तब्बूची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती.


४. रेखा


बऱ्याच काळापासून रेखा आपल्या सौंदर्याने बॉलीवूडमध्ये सर्वाना घायाळ करत आहे. रेखाने फुल बने अंगारे या चित्रपटामध्ये पोलिसाची भूमिका साकारली होती. ज्यामध्ये तिने इन्स्पेक्टरची व्यक्तिरेखा साकारली होती. हि भूमिका तिच्या चाहत्यांना खूपच आवडली होती. आजही तिचे चाहते तिच्या या भूमिकेची आठवण काढतात.


५. राणी मुखर्जी


राणी मुखर्जी सर्वात प्रथम मर्दानी या चित्रपटामध्ये पोलिसांच्या वर्दीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. या चित्रपटामध्ये तिला पोलिसांची भूमिका चांगलीच सूट झाली होती. त्याचबरोबर तिच्या मर्दानी २ चित्रपटातदेखील ती पुन्हा आपल्याला पोलिसांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने