पा चित्रपटामध्ये ऑरोच्या मित्राची भूमिका साकारणारी आणि टीव्हीवर रसनाच्या जाहिरातीमध्ये काम केलेली तरुणी सचदेव आणि तिच्या आईचे प्लेन क्रॅशमध्ये निधन झाले होते. तरुणी सचदेवने आपल्या क्युटनसने लोकांना वेडे केले होते. तिचा जन्म १४ में १९९८ रोजी झाला होता. तिचे वडील हरेश सचदेव इंडस्ट्रियलिस्ट होते आणि तिची आई गीता सचदेव गृहिणी होती. जेव्हा अवघ्या ५ वर्षाची तरुणी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आली तेव्हा तिने फक्त एका जाहिरातीमधून लोकांना अक्षरशः वेडे केले होते.
तरुणी सचदेव इतकी लोकप्रिय झाली होती कि तिला शाहरुख खान, अमिताभ बच्चअन सारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. पण २०१२ मध्ये झालेल्या प्लेन क्रॅशमध्ये तरुणीचे निधन झाले होते. जेव्हा ती सणांमध्ये नाटकामध्ये भाग घेत होती आणि कोणाची तरी नजर तिच्यावर हास्यावर पडली आणि त्यानंतर रसना आणि नंतर कोलगेट, आईसीआईसीआई बँक, रिलाइंस मोबाइल, एलजी, कॉफी बाइट, गोल्ड विनर, शक्ति मसाला सारख्या प्रोडक्ट्सरच्या जाहिरातींमध्ये काम करण्याची तिला संधी मिळाली.
तरुणी शाहरुख खानचा टीव्ही शो क्या आप पांचवीं पास से तेज हैं मध्ये सुद्धा पाहायला मिळाली होती. यानंतर तिने मल्याळम चित्रपट वेल्लिनक्षत्रम मध्ये काम केले. या चित्रपटाचे दिग्दर्शक सांगतात कि मी तरुणीला अमिताभ बच्चन सोबत एका जाहिरातीमध्ये काम करताना पाहिले आणि जाहीरात एजंसीकडून तिचा नंबर मागून घेतला आणि तिला कॉल केला.
जेव्हा तरुणी फोनवर आली तेव्हा तिने मला सांगितले कि अंकल मला चित्रपटामध्ये काम करायचे आहे. तिने अमितजींसोबत पा चित्रपटामध्ये सुद्धा काम केले आहे. दुःखाची गोष्ट हि आहे कि, ज्यावेळी तिचा वाढदिवस होता त्याचदिवशी तिचे निधन झाले होते. ती नेपाळच्या अग्नि एअर फ्लाइट सीएचटी प्लेन क्रॅशमध्ये या जगाला सोडून निघून गेली. ज्यावेळी तिचे निधन झाले त्यावेळी ती अवघ्या १४ वर्षांची होती.
तिच्यासोबत १६ भारतीय, २ डेनमार्कचे राहणारे आणि पायलट क्रूचे तीन सदस्य होते आणि या घटनेमध्ये १३ प्रवासी आणि पायलट क्रूच्या दोन सदस्यांचे निधन झाले होते. तरुणीचे आपल्या मित्रांना शेवटचे शब्द होते कि, मी तुम्हा सर्वांना शेवटची भेटत आहे, कारण जर प्लेन क्रॅश झाला तर....तिच्या अचानक जाण्याने आईवडिलांना खूपच मोठा धक्का बसला होता आणि तिच्या निधनानंतर अमिताभ बच्चन आणि करिश्मा कपूरने ट्वीट करून दु:ख व्यक्त केले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने