देशामध्ये कोरोनामुळे लॉकडाउन सुरू आहे. या कठीण काळामध्ये अनेक फिल्मी कलाकार लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. तथापि सर्वात कौतुक बॉलीवूडचा अभिनेता सोनू सूदचे होत आहे. सोनू सूद मुंबईमध्ये राहणाऱ्या स्थलांतरित मजुरांना घरी पाठवण्याची व्यवस्था करत आहे, ज्यामुळे त्याचे खूपच कौतुक होऊ लागले आहे. आज आपण सोनू सूदच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घेणार आहोत.

कुटुंब
 ४६ वर्षाचा सोनू सूद मुळचा पंजाब येथील मोगाचा आहे. त्याने इंजीनियरिंगचे शिक्षण घेतले होते, पण अभिनय आणि मॉडेलिंगची आवड असल्यामुळे तो बॉलीवूडमध्ये आला. सोनूच्या कुटुंबामध्ये त्याची पत्नी सोनाली तथा दोन मुले ईशान आणि अयान आहेत. सोनू सूदची पत्नी त्याच्यासोबत कॉलेजमध्ये शिकत होती. दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले, ज्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तथापि सोनूची पत्नी सोनाली बॉलीवूडच्या लाईमलाइटपासून दूर राहणेच जास्त पसंत करते.

रंजक आहे लव्हस्टोरी

सोनू आणि त्याची पत्नी सोनालीने प्रेम विवाह केला आहे. सोनू पंजाबी कुटुंबातील आहे तर सोनालीचा तेलगु कुटुंबाशी संबंध आहे. माहितीनुसार दोघांची पहिली भेट यशवंतराव इंजीनियरिंग कॉलेजमध्ये झाली होती. सोनूने मुलाखतीमध्ये सांगितले होते कि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याची पत्नी सोनालीने त्याला साथ दिली आहे. मुंबईमध्ये संघर्षाच्या दिवसात त्याला अशा फ्लॅटमध्ये राहावे लागले, जिथे त्याच्याशिवाय आणखीन तिघेजण राहत होते, पण सोनालीने याबद्दल कधीच तक्रार केली नाही ती आनंदाने त्याच्यासोबत त्या छोट्याशा खोलीत राहिली.

पत्नीची इच्छा नव्हती सोनूने अभिनेता बनावे

सोनूने एका मुलाखतीमध्ये हे देखील सांगितले होते कि इंजीनियरिंग झाल्यानंतर माझ्या पत्नीची इच्छा नव्हती कि मी अभिनेता बनावे, पण आता तिला माझा अभिमान आहे. सोनूने सांगितले कि इंजीनियरिंगच्या दिवसांमध्ये त्याने मॉडेलिंगची सुरुवात केली होती, नंतर तो अभिनयाच्या जगतामध्ये आला. बॉलीवूडमध्ये संधी मिळत नव्हती, तर त्याने तेलुगू, तमिळसह इतर भाषेमध्ये नशीब आजमावायला सुरुवात केली, तेलुगू, तमिळसोबत पंजाबी चित्रपटांमध्ये देखील त्याने काम केले. हळू हळू त्याला बॉलीवूडमधून देखील ऑफर येऊ लागल्या.

कुटुंबीयांनी केला सपोर्ट

आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना सोनू सूद म्हणाला कि आम्ही इंजीनियरिंग कॉलेजमध्ये भेटलो, मी तिला पाहताच तिच्या प्रेमात पडलो होतो. तथापि आम्ही काही दिवस दोस्त राहिलो, नंतर वाटले कि आम्हाला प्रेम झाले आहे, ज्यानंतर आम्ही कुटुंबियांसोबत बातचीत केली, त्यांनी देखील यावर आक्षेप घेतला नाही, ज्यानंतर २५ सप्टेंबर १९९६ रोजी आम्ही लग्न केले. सुरुवातीची काही वर्षे संघर्षामध्ये गेली पण नंतर सर्व काही चांगले होऊ लागले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने