टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध रियालिटी शो कौन बनेगा करोड़पति सीजन १२ चे रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. या शोने आतापर्यंत अनेक लोकांचे नशीब बदलले आहे. १९ वर्षांपूर्वी २००१ मध्ये याच शोमध्ये आलेल्या १४ वर्षाच्या रवी मोहन सैनीने इथे १ करोड रुपयांची रक्कम जिंकली होती.

रवी मोहन आता आईपीएस बनला आहे आणि त्याला गुजरातच्या पोरबंदरचा एसपी बनवले गेले आहे. जेव्हा रवी मोहनने केबीसीमध्ये इतकी मोठी रक्कम जिंकली होती तेव्हा तो १० वी मध्ये शिकत होता.
रवी मोहन सैनीने पोरबंदरच्या एसपीचा पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी तो राजकोटमध्ये डीसीपी म्हणून कार्यरत होता. कौन बनेगा करोड़पति जूनियरमध्ये एक करोड रुपये जिंकल्यानंतर १३ वर्षांनी म्हणजेच २०१४ मध्ये तो आईपीएस ऑफिसर बनला होता.
आता रवी मोहन सैनी ३३ वर्षांचा झाला आहे याआधी रवीने २०१४ मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली होती आणि गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी म्हणून त्याची निवड झाली होती. रवीचे वडील नेव्हीमध्ये होते आणि आता ते सेवानिवृत्त झाले आहेत.
रवी मोहन सैनी मुळचे राजस्थानातील अलवर येथील आहेत. रवीने शाळेपासून ते एमबीबीएसचे शिक्षण घेण्यापर्यंत यूपीएससीची परीक्षा देखील पास केली. अमिताभ बच्चनच्या कौन बनेगा करोड़पति जूनियर शोमध्ये रवीने सर्व १५ प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन १ करोड रुपये जिंकले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने