पिकलेली केळी तर आपण नेहमीच खातो आणि आपल्याला हे पण माहिती आहे कि केळी आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात. पण कधी तुम्ही कच्च्या केळींचे फायदे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? तर कच्ची केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत त्यापैकी ५ फायदे जाणून घेणार आहोत.
१. कच्च्या केळींमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते त्यामुळे आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन आणि अँटिऑक्सीडंट मिळतात. यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्यामुळे आपल्याला दिवसभर अॅक्टिव्ह राहण्यास मदत मिळते.

२. कच्च्या केळींमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि स्टार्च असतात जे आतड्यांमध्ये संक्रमण थांबवण्यास मदत करतात आणि त्यामुळे पोट साफ राहते. कब्ज्याचा त्रास असल्यास कच्ची केळी अवश्य खावीत.

३. पचन क्रिया सुधारण्यासाठी देखील कच्ची केळी उपयुक्त ठरतात. कच्च्या केळींमुळे पाचक रसांचा स्राव व्यवस्थित होतो आणि पचन क्रिया सुधारण्यास मदत मिळते.

४. हाडे मजबूत करण्यासाठी देखील कच्ची केळी उपयुक्त ठरतात. कच्च्या केळींमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते जे हाडांसाठी खूप फायदेशीर असते. सांधेदुखीच्या त्रासामध्ये देखील कच्ची केळी उपयुक्त ठरतात.

५. मधुमेह असेल तर कच्ची केळी फायदेशीर ठरतात त्याचबरोबर भूक नियंत्रित ठेवण्यासाठी देखील कच्ची केळी मदत करतात, ज्यामुळे ओवर ईटिंग किंवा वाईट खाण्याच्या सवयी टाळू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने