हळद हे औषधी गुणांचे भांडार आहेत, यांच्या सेवनाने शरीरातील अनेक आजार दूर होतात. अनेक लोक हळदीचे सेवन भाजी आणि दुधामध्ये घालून करतात आणि अनेक लोक हळदीचे ज्यूस बनवून देखील पितात. हळद आपल्या शरीराला मजबुती प्रदान करण्यासोबतच आणि अनेक प्रकारच्या आजारांपासून देखील दूर ठेवते. हळदीचे ज्यूस आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असते.

हळदीचे ज्यूस पिल्याने आपल्या शरीराला मिळतात अनेक फायदे

१. रक्त शुध्द करण्यासाठी मदत करते
हळदीचे ज्यूस आपल्या शरीरातील रक्त शुध्द करते. हळदीच्या सेवनाने शरीरातील अशुद्धी बाहेर पडते. हळद आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते आणि शरीराला रोग सहजरित्या लागू शकत नाहीत.

२. सूज कमीकरते हळदीचे ज्यूस
जर शरीराच्या कोणत्याही भागावर सूज येत असेल तर हळदीचे ज्यूस पिल्याने त्वरीत सूज दूर होते. हळदीच्या ज्यूसने संधिवात दूर होण्यास मदत मिळते.

३. वजन कमी करते
जर तुमच्या शरीराचे वजन खूपच जास्त असेल, तर दररोज नियमितपणे हळदीच्या ज्यूसचे सेवन करावे. हळदीच्या ज्युसचे सेवन केल्याने शरीराचे वजन कमी होण्यास मदत मिळते. जर हळदीच्या ज्यूसचे नियमितपणे एक महिना सेवन केले तर आपल्या शरीराचे वजन जवळ जवळ २ किलो वजन कमी होईल. हळद शरीराची चरबी कमी करण्यास मदत करते.

४. यकृत निरोगी ठेवण्यास मदत करते
हळदीचे ज्यूस यकृत निरोगी ठेवते आणि पोटाच्या बर्यारच आजारांपासून संरक्षण करते. पोटाचे आजार दूर करण्यासाठी हळदीचे ज्यूस खूपच फायदेशीर आहे.

५. जखम भरण्यासाठी आणि त्वचा उजळण्यासाठी फायदेशीर
हळद शरीरातील जखमा भरण्यासाठी आणि त्वचा उजळण्यासाठी मदत करते. हळदीच्या सेवनाने त्वचेशी संबंधित आजार दूर होतात.

हळदीचे ज्यूस बनवण्याची विधी

साहित्य:- कच्ची हळद किंवा हळद पावडर, लिंबू आणि मीठ

हळदीचे ज्यूस बनवण्यासाठी थोडेसे पाणी, हळद, लिंबू आणि मीठ यांचे मिश्रण तयार करून घ्यावे. हे मिश्रण काढून एक कप पाण्यात एक चमचा मिश्रण मिसळा. हळदीचे ज्यूस बनून तयार होईल, आता हे ज्यूस तुम्ही पिऊ शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने