४९ व्या वर्षी गोविंदा चक्क दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकला होता. होय हि बातमी खरी आहे आणि त्याने इतर कोणाशीही लग्न न करता आपल्या पत्नीसोबतच दुसरे लग्न केले होते. या वयामध्ये दुसऱ्यांदा लग्न करण्याचे कारणही तितकेच खास होते.

११ मार्च १९८७ रोजी गोविंदा आणि सुनिता यांचे लग्न झाले होते. लग्नाच्या अगोदर दोघांचे बरेच वर्षे अफेयर राहिले होते. आजही ते नेहमी आपल्याला एकत्र पाहायला मिळत असतात. गोविंदा सोशल मिडियावर देखील खूपच अॅक्टिव्ह असतो. नेहमी तो त्याचे आणि सुनिताचे फोटो शेयर करत असतो. सुनिता आणि गोविंदा यांनी पुन्हा लग्न करण्यामागे एक खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे.
१९८७ मध्ये सुनिता आणि गोविंदा यांनी कुटुंबियांच्या उपस्थित खूपच साध्या पद्धतीने मंदिरामध्ये लग्न केले होते. जवळजवळ वर्षभर या लग्नाची बातमी कोणालाही कळाली नव्हती. गोविंदाने त्या काळामध्ये नुकतेच आपल्या करियरची सुरवात केली होती. त्यामुळे जर आपल्या लग्नाची बातमी जर आपल्या फॅन्सना समजली तर आपल्या फॅन्सची संख्या कमी होईल असे गोविंदाला वाटले होते. म्हणून गोविंदाची मोठी मुलगी नम्रताचा जन्म होईपर्यंत त्यांनी आपल्या लग्नाची बातमी गुपितच ठेवली होती. पण आपण लपूनछपून लग्न केले आहे हे गोविंदाला पटले नाही. म्हणून त्याने लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी अगदी थाटामाटात पुन्हा लग्न केले.

सुनिता आणि गोविंदाची लव्हस्टोरी देखील खूपच इंटरेस्टिंग आहे. सुनिताची मोठी बहिण आणि गोविंदाचा मामा यांचे लग्न झाले होते. आपल्या बहिणीला भेटण्यासाठी सुनिता नेहमी त्यांच्या घरी येत जात राहायची. त्यावेळी ते दोघे खूपच लहान होते. यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड भांडणे व्हायची. दोघांचाहि स्वभाव एकमेकांच्या विरुद्ध होता.
विशेष म्हणजे गोविंदा आणि सुनिता यांना डांसची खूपच आवड होती. त्यामुळे गोविंदाचे मामा सुनिता आणि गोविंदा या दोघांमध्ये डांसची कॉम्पिटिशन घ्यायचे. पण सुनिता हि उच्चभ्रू सोसायटीतील असल्यामुळे तिला गोविंदासोबत स्पर्धा करायला आवडत नव्हते. हळूहळू याच भांडणामुळे त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली.

त्यावेळी फोनची सुविधा जास्त नसल्यामुळे ते एकमेकांना लव्हलेटर लिहित असत आणि लव्हलेटर पोहोचवण्याचे काम सुनीताचा भाऊ करत असे. एक दिवस हे पत्र सुनीताच्या आईला सापडले त्या पत्रामध्ये गोविंदाला सुनीताने ताबडतोब लग्न करण्याचे सांगितले होते. गोविंदाची आई निर्मिला देवी यांना सुनिता खूपच आवडली म्हणून दोघांच्या कुटुंबीयांनी घरच्याघरीच लग्न उरकून घेण्याचा निर्णय घेतला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने