कोरोना महामारीने संपूर्ण देशात लॉकडाउन चालू असताना दूरदर्शन वर रामानंद सागर ची रामायण ही सिरीयल दाखवण्यात येत आहे. या सिरीयल मधले कलाकार सध्या चर्चेत आहेत. रामायण मधील राम, लक्ष्मण, सीता दीपिका चिखलिया, अरुण गोविल आणि सुनील लहरी हे सर्व कलाकार ऐका रातोरात  प्रसिद्ध झाले होते. रामायण पुन्हा एकदा सुरु झाल्या मुळे सुनील लहरी यांनी दीपिका चिखलिया सोबत असलेली जुनी फोटो सोशल मीडिया वर शेयर केली आहे.
सुनील ने आपल्या ट्विटर अकाउंट वर शेयर केला आहे. तसेच हाच फोटो दीपिका चिखलिया ने आपल्या इंस्टाग्राम वर शेयर केली आहे. फोटो मध्ये सुनील लहरी आणि दीपिका दिसत आहे. या फोटोला शेयर केल्या नंतर दीपिकाने असे लिहिले की विक्रम और बेताल ही सिरीयल रामायण च्या अगोदर ची आहे. दीपिका आणि सुनील रामानंद सागर च्या विक्रम और बेताल या सिरीयल मध्ये काम केले होते. त्या दिवसाची आठवण म्हणून दीपिकाने हा फोटो शेयर केला आहे.
विक्रम और बेताल हे सिरीयल साल १९८८ मध्ये प्रसारित करण्यात आले होते. या सिरीयल मध्ये दीपिका आणि सुनील सोबत अरुण गोविल ही होते. या सिरीयल मध्ये अरुण गोविल राजा विक्रमादित्य यांचा रोल करत होते. तसेच दीपिका आणि सुनील यांनी ही यात काम केले आहे. टीव्ही सिरीयल बनवण्या अगोदर रामानंद सागर सिनेमा बनवत होते. अचानक त्यांनी टीव्ही वरती सिरीयल बनवण्याचा निर्णय घेतला बऱ्याच लोकांना त्याचा हा निर्णय आवडला नव्हता.
परंतु त्यांनी रामायण बनवण्याचा निर्णय घेतला. रामायण बनवण्या साठी रामानंद यांना कुठलाही फंड मिळत नव्हता. कारण की लोकांना असे वाटत होते की मुकुट आणि पुंछ् हे कॉन्सेप्ट चालेल का. जेव्हा रामायण साठी फंड जमले नाही तेव्हा त्यांनी १९८६ मध्ये विक्रम बेताल हे सिरीयल बनवण्याचा निर्णय घेतला. हे सिरीयल प्रसिद्ध झाल्या नंतर रामानंद सागर ला रामायण साठी फाइनेंसर्स भेटले. एका इंटरव्यू मध्ये रामानंद सागर म्हणाले होते की विक्रम बेताल चा एक एपिसोड बनवायला एक लाख रुपय लागत होते. रामायण पुन्हा प्रसारित झाले आहे. या सिरीयल ला पहिल्यादा जसे प्रेम मिळत होते तसेच प्रेम आताही मिळत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने