जरा विचार करा ३३ रुपयांमध्ये बियरची एक बाटली मिळू लागली तर किती मोठी गर्दी जमेल. जर खाण्यापिण्याबद्दल बोलायचे झाले तर पहिल्याच्या काळामध्ये २ रुपयांमध्ये मसाला डोसा-कॉफी आणि २० रुपयांपेक्षा कमीमध्ये स्वादिष्ट दाल-मखनी मिळत होती.
तथापि आजच्या काळामध्ये असा आपण विचार देखील करू शकत नाही. सध्या असाच एक किस्सा ३० वर्षांपूर्वी दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये पाहायला मिळाला. जेव्हा लोक खाण्यापिण्यासाठी जात होते आणि फक्त १०० रुपयांपेक्षा कमी पैसे खर्च करत होते.
नुकतेच निबेदिता चक्रवर्ती नावाच्या एका युजरने फेसबुक ग्रुपवर जुन्या बिलांचे फोटो शेयर केले आहे, जिथे ती आणि तिचे पती खाण्यापिण्यासाठी बाहेर गेले होते. १९८९ चे बिल क्वालिटी रेस्टॉरंट आणि अलका हॉटेलचे होते. जर तुम्ही बिल जवळून पाहिले तर तुम्ही खूपच हैराण व्हाल.
उदाहरण म्हणून क्वालिटी रेस्टॉरंटमध्ये खाण्यापिण्याचे बिल फक्त १९६ रुपये होते. त्यांनी जे जेवण केले त्याची किंमत देखील चकित करणारी होती. दाल मखनीच्या एक प्लेटची किंमत फक्त १८ रुपये होती तर चिकन दो प्याजाच्या प्लेटची किंमत ३८ रुपये होती. रायत्याच्या एका वाटीची किंमत फक्त २८ रुपये होती.
सध्या तुम्ही जर चिप्सचे एक पाकीट किंवा पाण्याची एक बाटली खरेदी केलात तर तुम्हाला खिश्यातून ४० रुपये द्यावे लागतील. बहुतेक कॅफे-बारमध्ये फक्त एका छोट्या स्टार्टरची किंमत २०० रुपयांपेक्षा अधिक होती, जी १९८९ मध्ये निबेदिताद्वारे दिलेली एकूण रक्कम होती. बियरच्या एका बाटलीसाठी त्यांनी फक्त ३३ रुपये दिले होते. आजच्या काळामध्ये सर्वात स्वस्त बियर १२० रुपये आहे. या बिलमध्ये विशेष बाब हि आहे कि हि किईम्त फक्त ३० वर्षांपूर्वीची आहे जी गेल्या तीन दशकांमध्ये इतकी वाढली आहे.