HomeViral१९७१ च्या भारत-पाक युद्धाचे हिरो भैरो सिंह शेखावत यांचे निधन, 'बॉर्डर' चित्रपटामध्ये...

१९७१ च्या भारत-पाक युद्धाचे हिरो भैरो सिंह शेखावत यांचे निधन, ‘बॉर्डर’ चित्रपटामध्ये सुनील शेट्टीने केली होती त्यांची भूमिका…

१९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धातील भारतीय सेनेने दोन मोर्चांवर पाकिस्तानसोबत लढा दिला होता. एक लढाई बांग्लादेश (ते पूर्व पाकिस्तान) मध्ये चालू होती, तर दुसरी लढाई राजस्थान सहित अनेक मोर्चांवर झाली. यामधील एक सर्वात प्रसिद्ध लढाई आहे लोंगेवालाची लढाई. या पोस्टवर फक्त १२० सैनिकांसोबत मेजर (नंतर ब्रिगेडियर) कुलदीप सिंह चांदपुरीने पाकिस्तान सेनेला सळोकिपळो करून सोडले होते. या लढाईवरच बॉर्डर चित्रपट बनला होता. या चित्रपटामध्ये मेजर चांदपुरीची भूमिका सनी देओलने केली होती.

चित्रपटामध्ये आणखी एक पत्र होते बीएसएफच्या भैरो सिंग शेखावत यांचे, ज्यांची भूमिका सुनील शेट्टीने केली होती. चित्रपटामध्ये या पात्राला शहीद दाखवले गेले होते, पण रियल लाईफमध्ये भैरो सिंह शेखावत आजपर्यंत जिवंत होते. सिंह शेखावत यांचे निधन सोमवार १९ डिसेंबर रोजी झाले. शेखावत यांनी जोधपुर AIIMS मध्ये अंतिम श्वास घेतला. त्यांना बीएसएफचे अनेक अधिकारी अंतिम निरोप देण्यासाठी पोहोचले होते.

भैरो सिंह शेखावत यांचा जन्म योद्ध्यांची भूमी असलेल्या सोलंकियातला गावात झाला होता. १९६३ मध्ये ते बीएसएफमध्ये भरती झाले होते. १९७१ च्या लढाई दरम्यान भैरो सिंह शेखावत यांची पोस्टिंग १४ बटालियन मध्ये होती, जिथे ते मेजर कुलदीप सिंह चांदपुरीच्या १२० सैनिकांसोबतच्या कंपनीसोबत लोंगेवाला पोस्ट वर होते. या पोस्टवर पाकिस्तानच्या एका पॅटर्न टॅंकच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना नाईक भैरो सिंह शेखावत यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. या लढाईमध्ये १२० सैनिकांनी मिळून पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना चोख प्रत्युत्तर दिले होते आणि पोस्टवर कब्जा घेतला होता.

या लढाईमध्ये भैरो सिंह शेखावत यांनी एकट्याने ३० पाकिस्तानी मारले होते. नंतर त्यांना या शौर्याबद्दल सेना मेडलने सन्मानित क्र्नाय्त आले. भैरो सिंह शेखावत हे १९८७ मध्ये सेवानिवृत्त झाले. अनेक वर्षे ते आपल्या गावामध्ये अज्ञाताचे जीवन जगत होते.

१९७१ च्या युद्धाच्या होरीच्या निधनावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून दुःख व्यक्त केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्वीटमध्ये लिहले आहे कि, नाइक (सेवानिवृत्त) भैरों सिंह यांना देशासाठी केलेल्या सेवेसाठी नेहमी स्मरणात ठेवले जाईल. त्यांनी देशाच्या इतिहासामध्ये के महत्वपूर्ण बिंदुवर महान साहस दाखवले. त्यांच्या निधनावर मी दुखी आहे. दुखाच्या या प्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. शांती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts