इंटरनेट असे जग आहे जिथे तुम्हाला अशा गोष्टी पाहायला मिळतात ज्यांच्याबद्दल आपण कल्पना देखील करू शकत नाही. याशिवाय काही अशा गोष्टी देखील पाहायला मिळतात ज्या पाहून आपण हैराण होतो. जर तुम्ही सोशल मिडियावर सक्रीय असाल तर तुम्हाला सध्या व्हायरल होत असलेली जुनी बिले देखील पाहू शकता.
हि बिले पाहिल्यानंतर सध्या लोक खूपच हैराण होत आहेत आणि हा विचार करत आहे कि महागाई किती वेगाने वाढत चालली आहे. व्हायरल होत असलेल्या जुन्या बिलानं पाहून लोकांना विश्वास बसत नाही आहे कि आधी इतक्या कमी किमतीत इतक्या गोष्टी मिळत होत्या. नुकतेच सोशल मिडियावर बुलेटचे बिल, सायकलचे बिल आणि गव्हाचे बिल तुम्ही पाहिले असेल. आता सोशल मिडियावर आणखी एक बिल व्हायरल होत आहे.
सध्या वाढत्या महागाईसोबत पेट्रोल आणि डीजेलच्या किमती देखील वेगाने वाढत आहेत हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे. अशामध्ये सोशल मिडियावर पेट्रोल पंपाची १९६३ मधील एक पावती व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ५ लिटर पेट्रोलची किंमत इतकी लिहिली आहे कि आजच्या काळामध्ये १ लिटर पेट्रोलच्या किमतीमध्ये त्या काळामध्ये तुम्ही १०० लिटर पेट्रोल खरेदी करू शकत होता.
सोशल मिडियावर भारत पेट्रोल सप्लाय को चे एक कॅश मेमो व्हायरल झाले आहे. असे मानले जात आहे कि हि पावती पेट्रोल भरल्यानंतर ग्राहकाला दिली असावी. जी २ फेब्रु १९६३ ची आहे. यामध्ये ५ लिटर पेट्रोलची किंमत ३ रुपये ६० पैसे लिहिली आहे. यानुसार एक लिटर पेट्रोल फक्त ७२ पैशाला मिळत होते. आत व्हायरल होत असलेला हा फोटो याआधी देखील व्हायरल झाला होता जो २०१५ मध्ये ट्विटर पासून सर्व सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला होता.
A Bharat Petrol Supply Co. Cash Memo dated 1963 ₹3.60 for 5 Ltrs waooo @AnthonySald @JhaSanjay @Tharoorian_INC @saileenas @dhruv_rathee @divyaspandana @rssurjewala @INCIndia @pradyutbordoloi @Nidhi @Supriyaray6 @imMAK02 pic.twitter.com/mikNpxAvkY
— Zahid S Hussain (@ZahidSHussain1) September 12, 2018