कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत आपण जेव्हा एखाद्या ट्रीपवर जातो तेव्हा ट्रेनच्या तिकिटचा जुगाड पहिला करावा लागतो. याचे अनेक कारण आहेत. एक तर तिकीट खूप महाग असते आणि दुसरे म्हन्ज्ते तिकीटासाठी खूप आटापिटा करावा लागतो. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का कि जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता तेव्हा ट्रेनच्या तिकिटाचे दर किती होते. नुकतेच असे एक तिकीट व्हायरल झाले आहे ज्यामधून अशी माहिती उघड झाली आहे कि किती रुपयांमध्ये लोक पाकिस्तानमधून भारतात येत होते.
वास्तविक हे तिकीट फेसबुकवर पाकिस्तान रेल लव्हर्स नावाच्या युजरने शेयर केले आहे. हे तिकीट भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतरचे आहे. माहितीनुसार हे ट्रेन तिकीट १७ सप्टेंबर १९४७ रोजी खरेदी केले होते. हैराणीची बाब आहे कि त्यावेळी डिजिटायझेशन नव्हते आणि तिकीटावर लावलेला स्टांप पेनचा वापर करून हाताने लिहिला जात होता.
तिकीटामध्ये हे देखील लिहिले आहे कि हे एसी-तीन कोचचे आहे. हे तिकीट रावळपिंडी ते अमृतसर जाणाऱ्या ट्रेनचे आहे. यामध्ये ९ लोकांचे भाडे जवळ जवळ ३६ रुपये दाखवले गेले आहे. याचा अर्थ असा झाला कि ९ लोकांना पाकिस्तानच्या रावळपिंडी पासून ते भारताच्या अमृतसर पर्यंत पोहोचण्यासाठी इतका खर्च येत होता. यानुसार एका व्यक्तीला फक्त चार रुपये तिकीट पडत होते.
हे तिकीट १७ सप्टेंबर १९४७ चे आहे यामुळे हे तिकीट पाहून लोक अंदाज लावत आहेत कि एक संपूर्ण कुटुंब पाकिस्तानमधून भारतामध्ये स्थलांतरित झाले होते. रावळपिंडी पासून अमृतसर दरम्यानचे अंतर जवळ जवळ ३०० किमी आहे. हे तिकीट जसे फेसबुकवर शेयर केले गेले लोक यावर प्रतिक्रिया देऊ लागले आहे. लोकांनी कमेंट केली आहे कि स्वातंत्र्याच्या पूर्वी पाकिस्तानमध्ये नॉर्थ वेस्टर्न रेल्वे झोन होता.
तर हे तिकीट पाहून लोकांनी हा देखील अंदाज लावला आहे कि हे तिकीट एखाद्या विदेशी नागरिकाचे आहे. दुसऱ्या एका मिडिया रिपोर्टनुसार पहिला पाकिस्तान पासून भारताचे तिकीट खरेदी करणे खुप्क सोपे होते. तथापि आता खूप काही बदलले आहे.