सध्या सोशल मिडियावर अनेक जुनी बिले व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. यामध्ये हॉटेलची बिले, मोटारसायकलची जुनी बिले, जुनी बाजाराची बिले तुम्ही पाहिली असतील. अशामध्ये आता आणखी एक बिल सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का कि स्वातंत्र्यापूर्वी घरचे लाईट बिल किती येत असेल.
चला तर आज आपण असेच एक बिल पाहूया जे स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातील आहे, जे ८३ वर्षे जुने आहे. सध्या हे लाईट बिल खूपच व्हायरल होत आहे. जे पाहिल्यानंतर लोक देखील हैराण होत आहेत. हे बिल एका महिन्याचे असून ज्यामध्ये अवघे पाच रुपये महिन्याचे बिल आलेले पाहायला मिळत आहे.
सोशल मिडियावर सध्या हे लाईट बिल खूपच व्हायरल होत आहे ज्यावर नेटिजन्स आश्चर्य व्यक्त करत आहेत. स्लीपवर तुम्ही पाहू शकता कि हे बिल १५ ऑक्टोबर १९४० चे आहे आणि बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रामवे कंपनी लिमिटेड या खाजगी कंपनीचे आहे जे ७ ऑगस्ट १९४७ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) ताब्यात घेतले होते.
व्हायरल झालेल्या या जुन्या बिलामध्ये तुम्ही पाहू शकता कि फक्त ३.१० रुपयांची वीज वापरण्यात आली आहे आणि कर जोडल्यानंतर हे बिल ५.२ रुपयांचे झाले आहे. त्या काळामध्ये लाईट बिल हि हाताने लिहिली जात होती जसे कि तुम्ही बिलामध्ये पाहू शकता.
हे बिल व्हायरल होताच नेटिजन्सनी जुन्या बिलाची तुला सध्या बिलासोबत करायला सुरुवात केली आहे. १९४० च्या काळामध्ये लाईटबिल फक्त ५ रुपये पती महिना उपलब्ध होती तर सध्या एक युनिटची किंमत ५ रुपयांवर गेली आहे.
1940: Electricity bill of The Bombay Electric Supply & Tramways Co Ltd pic.twitter.com/jfa7RqbRz4
— Mumbai Heritage (@mumbaiheritage) August 7, 2020